Sanjay Raut criticizes Sudhakar Badgujar, saying that party itself removed those who had problems
शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर हे आज मंगळवारी (ता. 17 जून) भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. या पक्षप्रवेशावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर हे आज मंगळवारी (ता. 17 जून) भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. आज सकाळी 7 च्या सुमारास बडगुजर यांचा हजारो कार्यकर्त्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. त्यामुळे मोठ्या शक्तीप्रदर्शनासह बडगुजर भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. पण त्यांच्या या प्रवेशाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून पक्षासाठी अडचणीचे ठरणाऱ्यांना पक्षातून दूर करण्यात आले असल्याचा टोला त्यांनी बडगुजर यांच्याबाबत बोलताना लगावला आहे. नाशिकमधील शिवसेना नेते, पदाधिकारी पक्षासोबतच आहे. नाशिकमधील शिवसेना खंबीर, मजबूत आणि अभेद्य असल्याचे राऊतांकडून सांगण्यात आले आहे. (Sanjay Raut criticizes Sudhakar Badgujar, saying that party itself removed those who had problems)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुधाकर बडगुजर आणि नाशकातील काही नेते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा याबद्दल राऊत म्हणाले की, सुधाकर बडगुजर आमच्या पक्षात होते, आमच्या पक्षातून त्यांना दूर करण्यात आले. त्यामुळे आता ते कोणत्याही पक्षात जाऊद्यात, त्याबाबत काहीही चर्चा होऊद्या. ते आता आमच्या पक्षात नाही, त्यामुळे हा विषय आमच्यासाठी संपला आहे. ज्यांना जायचे होते, ते गेले आणि ज्यांना पक्षातून दूर करायचे होते, त्यांना दूर केले. आता फक्त नावे येत आहेत, चर्चा सुरू आहेत, ही फक्त हवेतील पंतगबाजी आहे. पक्षाला अडचणीचे ठरणाऱ्या माणसांना पक्षापासून दूर करण्यात आले आहे, असे यावेळी राऊतांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.
हेही वाचा… Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजरांचा भाजपात होणार प्रवेश, पण प्रदेशाध्यक्ष बावनकुळेच अनभिज्ञ
तसेच, नाशिकमधील शिवसेना मजबूत असून सर्व पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. या हवेतील चर्चांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. बबनराव घोलप सध्या फिरता रंगमंच आहेत. त्यांचे पुत्र योगेश घोलप पक्षाचे उमेदवार होते. त्यांच्यासाठी संघर्ष करून आम्ही जागा मिळवली होती. ज्या नावांची चर्चा होत आहेत, त्यांनी आज सकाळीच माझ्यासोबत संपर्क साधून आपण पक्षासोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चर्चांना काहीही अर्थ नाही. त्यामुळे पक्ष प्रवेश होऊ द्या, मग याबाबत बोलू, असे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Comments are closed.