RCB ला चॅम्पियन बनवणाऱ्या स्टार खेळाडूने केली वनडेमधून निवृत्तीची घोषणा..!

सोफी डेव्हिन रिटायर्ड फॉर्म एकदिवसीय क्रिकेट: न्यूझीलंड महिला संघाची कर्णधार सोफी डिवाईन (Sophie Devine) येत्या विश्वचषकानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. हा विश्वचषक यावर्षी भारत आणि श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. सोफी डिवाईनला महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलूंमध्ये गणले जाते.(Sophie Devine ODI retirement)

डिवाईनने 152 वनडे सामन्यांमध्ये 31.66च्या सरासरीने 8 शतकांच्या मदतीने 3,990 धावा केल्या आहेत. तसेच 146 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1 शतक झळकावत 3,431 धावा केल्या आहेत. तिने वनडे आणि टी20 मध्ये अनुक्रमे 107 आणि 119 विकेट्स घेतल्या आहेत. (Sophie Devine ODI Cricket Stats)

35 वर्षीय डिवाईनने आजपर्यंत एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे ती अशा मोजक्या खेळाडूंमध्ये सामील होते, ज्यांनी 300 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय वनडे व टी20 सामने खेळले आहेत, पण एकही कसोटी सामना खेळलेला नाही. (Sophie Devine no Play test match)

न्यूझीलंड क्रिकेटने मंगळवारी (17 जून) दिलेल्या निवेदनात डिवाईन म्हणाली, “माझ्यासाठी हा योग्य निर्णय घेण्याची वेळ आहे असं मला वाटतं. न्यूजीलंड क्रिकेटने मला हा निर्णय घेण्यात मदत केल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. याचा अर्थ असा की मी अजूनही न्यूझीलंडसाठी खेळू शकते.” (Sophie Devine Statement Of ODI Retirement)

न्यूझीलंड क्रिकेटकडून 17 केंद्रीय करारित खेळाडूंची घोषणा होण्याआधीच डिवाईनने आपली भूमिका स्पष्ट केली. ही घोषणा बुधवारी केली जाणार आहे. वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही डिवाईन टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी उपलब्ध राहील, मात्र तिला केंद्रीय करार दिला जाणार नाही. (Sophie Devine contract)

सोफी डिवाईन वुमेन्स प्रीमियर लीग (WPL) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाकडून खेळत आहेत. RCB महिलांनी 2024 मध्ये डब्ल्यूपीएलचे पहिले विजेतेपद जिंकले होते. डिवाईनने WPL मध्ये आतापर्यंत 18 सामन्यांत 268 धावा केल्या आहेत. त्याच वेळी तिने 9 विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत. (Sophie Devine WPL Stats)

Comments are closed.