दादरमध्ये ‘डॉक्टर डे’ निमित्त विशेष कार्यक्रम

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या परळमधील नाना पालकर स्मृती समितीच्यावतीने डॉक्टर डे निमित्त सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या डॉक्टर तसेच मान्यवरांचा सन्मान करत असते. या वर्षी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशीषकुमार चौहान हे प्रमुख पाहुणे आहेत. त्याचबरोबर चाणक्य मंडळ परिवार न्यासाचे संस्थापक आणि माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान होणार आहे. तरी कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष डॉ. श्रीकांत बडवे आणि सचिव सतीश तांबा यांनी केले आहे. कार्यक्रम 6 जुलैला दादर पूर्व येथील राजा शिवाजी महाविद्यालयातील बी. एन. वैद्य सभागृहात सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे
Comments are closed.