कमल हसनचा ‘ठग लाईफ’ कर्नाटकात प्रदर्शित होणार

अभिनेता कमल हसनला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ‘ठग लाईफ’ चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित करायला हवा, असे सुप्रीम कोर्टाने म्हटलेय. कायद्यानुसार सीबीएफसी मंजुरी मिळालेल्या चित्रपटाला प्रत्येक राज्यात प्रदर्शित करायला हवे, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले. ‘ठग लाईफ’ हा चित्रपट 5 जून 2025 पासून देशभरात प्रदर्शित करण्यात आला, परंतु भाषावादावरून कर्नाटकात या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले होते. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचल्यानंतर लोकांना धमकावणे, सिनेमागृह जाळण्याची धमकी देणे खपवून घेतले जाणार नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे.

Comments are closed.