मी दररोज दहा तास काम करते

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या आठ तासांच्या डय़ुटीवरून बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्यानंतर आता अभिनेत्री जेनेलिया डिसुजा हिनेही चित्रपटसृष्टीतील कामावर भाष्य केले आहे. मी दररोज दहा तास काम करते, कधी कधी तर दिग्दर्शकामुळे 11 किंवा 12 तास काम करावे लागते. मला वाटते हे ठीक आहे, परंतु याला ऍडजस्टमेंट करण्यासाठी वेळ मिळायला हवा, असे जेनेलिया म्हणाली. संदीप रेड्डी वांगाच्या ‘स्पिरिट’ चित्रपटात दीपिका पादुकोणने आठ तास काम करण्याची अट ठेवली होती. तसेच 40 कोटी रुपयांची डिमांड केली होती. त्यामुळे दीपिकाला या चित्रपटातून काढून टाकल्याची चर्चा आहे.

Comments are closed.