दुसर्‍या सत्रात सेन्सेक्स 212 गुण खाली पडला

औषध उद्योगाला फटका : निफ्टीही प्रभावीत होत बंद

मुंबई :

भारतीय भांडवली बाजारात मंगळवार, 17 जून रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्या निर्देशांकांमध्ये घसरण नोंदली गेली. बाजारात दबाव येण्याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक पातळीवर सुरु असलेला इराण आणि इस्रायलमधील तणाव होय. यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. दोन्ही देशांमधील तणाव कायम आहे, ज्यामुळे भारतीय शेअरबाजारातील निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 50 दोन्ही घसरणीसह बंद झाले आहेत.

मुख्य कंपन्यांच्या मदतीने मंगळवारी, सेन्सेक्स 81,869 वर उघडला. परंतु दिवसअखेर 30 समभागांचा मुंबई शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स 212.85 अंकांच्या नुकसानीसह निर्देशांक 0.26 टक्क्यांनी प्रभावीत होत 81,583.30 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 93.10 अंकांनी घसरुन निर्देशांक 24,853.40 वर बंद झाला.

बाजारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप विभागांची कामगिरी कमकुवत राहिली. एकीकडे, बीएसई मिडकॅप निर्देशांकात 0.56 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांकात 0.67 टक्के घसरण दिसून आली. दरम्यान, बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल मागील सत्रातील सुमारे 450.5 लाख कोटी रुपयांवरून 448 लाख कोटी रुपयांवर घसरले. यामुळे, गुंतवणूकदारांना एकाच सत्रात 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला.

या घसरणीदरम्यान, टेक महिंद्रा निफ्टी 50 च्या सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या कंपन्यांच्या यादीत 1.46 टक्के वाढून अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर इन्फोसिस 1 टक्क्याने, एशियन पेंट्स 0.9 टक्क्यांनी, टीसीएस 0.55 टक्क्यांनी आणि मारुती सुझुकी 0.52 टक्क्यांनी घसरला आहे. तर निफ्टी 50 च्या सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या कंपन्यांच्या यादीत, अदानी एंटरप्रायझेसमध्येही 2.19 टक्क्यांनी घट झाली. त्यानंतर, सन फार्मा 2.09 टक्क्यांनी, डॉ. रे•ाrज 2.08 टक्क्यांनी, इटरनल 1.95 टक्क्यांनी आणि ओएनजीसी 1.75 टक्क्यांनी घसरले.

क्षेत्रांचे निर्देशांक

एक दोन वगळता इतर निर्देशांक घसरुन बंद झाले. निफ्टी आयटी 0.72 टक्के, निफ्टी इंडिया डिफेन्स 0.38 टक्के वधारले. याच वेळी, ट्रम्प यांनी फार्मा क्षेत्रावर शुल्क लादण्याची चर्चा पुन्हा केल्यानंतर निफ्टी फार्मामध्येही 1.89 टक्के घसरण झाली. यानंतर, निफ्टी मेटल्समध्ये 1.43 टक्के, निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये 0.73 टक्के, निफ्टी इंडिया टुरिझममध्ये 0.69 टक्के घसरण झाली.

Comments are closed.