प्रेम लग्न, अपहरण, पोलिस अधिका officer ्याला अटक

तामिळनाडूमधील चकित करणारी घटना : आमदाराला चौकशीसाठी हजर रहावे लागणार

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडुत अतिरिक्त पोलीस महासंचालक एच.एम. जयराम यांना अटक करण्यात आली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने प्रेमविवाहावरुन कौटुंबिक वादाशी निगडित एका कथित अपहरण प्रकरणी तपासकर्त्यांना जयराम यांना अटक करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने आमदार आणि पुरात्ची भारतम पक्षाचे प्रमुख पूवई जगन मूर्ती यांनाही चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर होण्याचा निर्देश दिला.

तुम्ही पोलीस चौकशीला का घाबरत आहात? एका आमदाराने इतरांसाठी आदर्श ठरायला हवे आणि कांगारू कोर्ट चालविले जाऊ नये अशी टिप्पणी न्यायाधीशांनी आमदाराच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावणी करताना केली आहे. जगन मूर्ती यांनी पक्ष कार्यकर्त्यांशिवाय पोलिसांसमोर हजर व्हावे. राजकीय पदाधिकाऱ्यांनी कायद्यापासून वाचण्यासाठी स्वत:च्या प्रभावाचा दुरुपयोग करू नये असेही न्यायाधीशांनी म्हटले आहे.

आमदाराच्या समर्थकांनी तामिळनाडूच्या तिरुवल्लूर येथे आमदाराला अटक करण्यापासून रोखले होते असे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. याप्रकरणी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी सुरू असलेल्या तपासात आमदाराच्या सहकार्याचे आकलन करणार असल्याचे संकेत न्यायालयाने दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

22 वर्षीय इसम आणि एका युवतीच्या विवाहाशी संबंधित हे प्रकरण आहे. युवतीचे वडिल वनराजा यांना हे नाते मान्य नव्हते. याप्रकरणी वनराजा यांनी कथित स्वरुपात महेश्वरी या बडतर्फ पोलीस कॉन्स्टेबलशी संपर्क साधला होता. तर महेश्वरीने अतिरिक्त पोलीस महासंचालक जयराम यांच्याशी संपर्क साधला. जयराम यांनी याप्रकरणी आमदार जगन मूर्तींकडे मदत मागितली. युवतीच्या पतीचा शोध न लागल्याने आमदाराच्या हस्तकांनी कथित स्वरुपात त्याच्या 16 वर्षीय भावाचे अपहरण केले होते. याप्रकरणी त्याच्या आईने पोलिसांकडे धाव घेतल्यावर अल्पवयीनाची मुक्तता करण्यात आली. परंतु अल्पवयीनाला अतिरिक्त पोलीस महासंचालक जयराम यांच्या कारमधून नेण्यात आल्याचे समोर आले. ही कार बडतर्फ कॉन्स्टेबल महेश्वरी चालवत होता आणि वनराजा देखील या कारमध्ये होते. अपहरण प्रकरणी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

जगन मूर्ती कोन?

जगन मूर्ती यांनी अण्णाद्रमुकच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. त्यांनी 2021 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत किल्वैथिनकुप्पम या राखीव मतदारसंघात विजय मिळविला होता. तर जगन मूर्ती यांनी अपहरण प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे.

Comments are closed.