13 षटकार, 48 चेंडूत शतक; मॅक्सीची तोडफोड खेळी, रोहित शर्माच्या बरोबरीसह ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव फलंदाज

ऑस्ट्रेलिया स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल तोडफोड फलंदाजीसाठी ओळखला जातो. अनेकदा त्याने मोक्याच्या क्षणी विस्फोटक फलंदाजी करत संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिलेले आहेत. 2023 मध्ये हिंदुस्थानमध्ये झालेल्या विश्वचषकात त्याने अफगाणिस्तानविरुद्ध जायबंदी असतानाही नाबाद द्विशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला होता. अर्थात आता त्याने वन डे क्रिकेटला रामराम ठोकला आहे. याच महिन्याच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याने निवृत्तीची घोषणा केली. वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी टी-20 क्रिकेटमध्ये तो सक्रिय असून त्याच्या बॅटमधून धावांची बरसातही होत नाही. अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेट 2025 मध्येही त्याने अशीच एक दमदार खेळी करत विक्रमांचे इमले रचले आहेत.
एमएलसीमध्ये एक वेडा ग्लेन मॅक्सवेल शंभर!
तो 11 वरून 15 वरून 49 च्या 106 वर गेला!
पूर्ण हायलाइट्स अवघ्या मिनिटांत येत आहेत 👀 pic.twitter.com/zwcpjnyals
– 7 क्रिकेट (@7 क्रिकेट) 18 जून, 2025
Comments are closed.