सामन्याचा वेळ बदलला? जाणून घ्या भारतात किती वाजता पाहता येईल सामना

कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया लीड्स मध्ये पोहोचलेली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी लीड्सला पोहोचण्यासाठी ट्रेनने प्रवास केला. आता पहिला सामना (20 जून) रोजी खेळला जाईल. त्याच वेळी, सामन्याच्या वेळे बाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, कारण जर ही मालिका भारतात खेळली गेली असती तर सामना सकाळी 9:30 वाजता सुरू झाला असता, परंतु ही मालिका इंग्लंडमध्ये खेळली जात आहे. म्हणूनच याची वेळ थोडी वेगळी असणार आहे.

इंग्लंडमधील मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळे नुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. सामन्याचा टॉस दुपारी 3 वाजता होईल. पहिले सत्र दुपारी 3:30 ते 5:30 पर्यंत खेळवले जाईल. या मालिकेतील सर्व सामने तुम्ही जिओ होस्टारवर पाहू शकता. शुबमन गिलची इंग्लंड मधील ही सिरीज त्याच्या साठी खूप मोठे आव्हान असणार आहे. कारण त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडमध्ये पहिली कसोटी मालिका खेळणार आहे आणि यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील टीम इंडियाचा भाग नाहीत, कारण हे दोन्ही दिग्गज कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.

Comments are closed.