‘पप्पांची नक्कल करू नकोस’; सुनिता आहुजांचा यशवर्धनला सल्ला – Tezzbuzz
गाविंडाचा (Govinda) मुलगा यशवर्धन आता बॉलीवुडमध्ये आपलं करिअर सुरू करताेय. त्याच्या डेब्यूच्या आधी त्याची आई सुनिता यांनी त्याला एक खास आणि महत्तवाचा सल्ला दिला आहे. 90 च्या काळात बॉलीवुडमध्ये गाेविंदाचाच जाेर हाेता. त्यांची विनाेदी अॅक्टिंग लाेकांना खूप आवडायची. त्यांनी लाेकांना खूप हसवलं आणि एंटरटेन केलं.
आता त्याचा मुलगा यशवर्धन आहूजा बॉलीवुड मध्ये एंट्री घेणार आहे. आणि सगळ्यांना त्याच्या डेब्यूची उत्सुक्ता आहे. यशवर्धनची आई सुनिता आहूजा, यांनी एका मुलाखतीत त्याच्या अभिनयाच कौतुक केलं आणि त्याला एक साध पण महत्तवाचा सल्ला दिला, “तुझ्या बाबांची नक्कल करु नकाे, स्वतःची वेगळी ओळख तयार कर”.
ईटाइम्सला दिलेल्या इंटरव्यूमध्ये सुनिता आहूजांनी सांगितलं की, यशवर्धन बॉलीवुडमध्ये एंट्रीसाठी जाेरात तयारी करत आहे. ती म्हणाली, “यश घरी माझ्यासाेबत स्किप्टवर चर्चा करताे. ताे स्वतःहून खूप छान तयारी करताेय आणि लवकरच माेठ्या पडद्यावर दिसणार आहे. ताे नेहमी म्हणताे, ‘मम्मी, हे विषय आहे, ही काॅन्सेप्ट आहे, आपण यावर बाेलूया’.”
सुनिता म्हणाल्या, “मी यशला स्पष्ट सांगितले, आपल्या पपांसारखं वागू नकाेस, त्यांची काॅपी करु नकाेस. मला नाही वाटत लाेक तुला फक्त गाेविंदाचा मुलगा म्हणून ओळखावेत. तू तुझी एक वेगळी ओळख बनवं. मला खात्री आहे, तू पप्पांपेक्षा माेठं नाव कमवशील”. बॉलीवुडमध्ये हिराे म्हणून एंट्री घेण्यापूर्वी यशवर्धनने वरुण धवनच्या ‘डिशूम’ आणि टाइगर श्रॉफच्या ‘बागी’ या चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम केलं आहे.
आता ताे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सई राजेश यांच्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात बाबिल खानसुद्धा असणार हाेता, पण ताे प्रोजेक्टमधून बाहेर पडल्यामुळे सध्या चित्रपटाचं काम थाेडं थांबलं आहे. गाेविंदाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी त्यांच्या चित्रपटांनी लाेकांना खूप हसवलं आणि सगळेयांची मनं जिंकली. ‘राजा बाबू’, ‘हीरो नंबर 1’, ‘बड़े मियां छोटे मियां’, ‘साजन चले ससुरल’ हे त्याचे चित्रपटे आजही लाेकांना खूप आवडतात. गाेविंदा शेवटचं 2019 मध्ये आलेल्या ‘रंगीला राजा’ या चित्रपटात दिसला हाेता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
या बच्चनने स्वतः केलेला करिश्मा कपूरचा भावी ‘सून’ म्हणून उल्लेख, मग का तुटले अभिषेक- करिश्माचे लग्न
पॅपराझींना पाहून मौनी रॉयने लपवला तिचा चेहरा; अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Comments are closed.