मुंबई विद्यापीठ देशातील सर्वोत्तम 20 शिक्षण संस्थांच्या यादीत!

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाने देशातील सर्वोत्तम 20 शिक्षण संस्थाच्या यादीत 17 वे स्थान पटकावीत शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. शिवाय राज्यातील पारंपारिक विद्यापीठांच्या यादीत द्वितीय स्थान पटकावले आहे. क्वाकरेली सायमंड (क्यूएस) या जागतिक पातळीवर काम करणार्या संस्थेने देश पातळीवर केलेल्या सर्वेक्षणामधून हा क्रमांक पटकावला आहे.जगासह देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्था आणि विद्यापीठांची यादी जाहीर केली असून या यादीमध्ये मुंबई विद्यापीठाची कामगिरी सर्वोत्तम आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने सर्वच क्षेत्रात उत्तम कामगीरी करत एंप्लॉयमेंट आऊटकममध्ये सर्वाधिक 95 गुण प्राप्त केले आहेत.
Comments are closed.