विश्वगुरू मोदी मागच्या रांगेत!

कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या जी-7 शिखर परिषदेच्या अखेरच्या दिवशी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी मोदींना या परिषदेसाठी निमंत्रित केले होते. यावेळी मोदींनी जागतिक नेत्यांशी हस्तांदोलन केले, त्यांची गळाभेटही घेतली. त्यानंतर हिरवळीवर फोटोसेशन झाले तेव्हा मोदींना मागच्या रांगेत स्थान देण्यात आले होते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की, मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना पहिल्या रांगेत स्थान मिळाले.

Comments are closed.