Mosquito : घरातील माश्या-किटकांनी हैराण? करा हे उपाय

पावसाळा आपल्यासोबत अनेक समस्या घेऊन येतो. त्यातील एक म्हणजे आजारपण आणि दुसरं म्हणजे घरात लहान-मोठ्या कीटक आणि माश्यांचा वावर. हे पावसाळी माश्या-कीटक घरात येताच घर घाण करतातच शिवाय आरोग्याच्या तक्रारीही वाढवतात. या किटकांमुळे डेंग्यू, मलेरियासारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या किटकांना पावसाळ्यात आरोग्य निरोगी राहण्यासाठी दूर ठेवणे गरजेचे असते. हे कीटक घरातील अडगळीच्या ठिकाणी लपून बसतात किंवा लाईट्सवर घोंघावत बसतात. तुमच्याही घरात पावसाळी कीटक, माश्या, किडे, मुंग्या आल्या असतील तर टेन्शन घेऊ नका. आज आपण घरातील माश्या-किटकांना दूर करण्याचे काही सोपे उपाय पाहणार आहोत.

उपाय –

  • घरामध्ये किडे येऊ नये यासाठी तुम्ही कापूर घरात जाळू शकता. घरात कापूर जाळल्याने किडे घरात थांबत नाहीत, किडे कापराच्या स्ट्राँग वासाने दूर पळतात.
  • किडे आणि मुग्यांना पळवण्यासाठी तुम्ही बेंकिग सोडा वापरू शकता. यासाठी बेंकिग सोडा पीठात टाकून कणीक मळून घ्या. तयार पीठाचे लहान-लहान गोळे घराच्या कोपऱ्यात ठेवा, याने घरातील मुंग्या निघून जातील.
  • बेंकिग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करुन स्प्रे तयार करा. हा स्प्रे किटकांना पळवण्यासाठी उपयुक्त ठरतो.
  • तुम्ही दररोज मीठाच्या पाण्याने लादी पुसू शकता. मीठाच्या पाण्याने लादी पुसल्याने मुंग्या, कीटक फिरणार नाहीत.
  • व्हाईट व्हिनेगरच्या वासाने किडे दूर होऊ शकतात. यासाठी व्हीनेगर स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि किड्यांवर फवारा.
  • लसूण देखील किटकांना पळवण्यासाठी उपयोगी आहे. यासाठी लसणाच्या पाकळ्या चेचून पाण्यात टाकून त्याचा स्प्रे तयार करून घ्या. घरात जिथे डास, मुंग्या दिसतील तिथे फवारा.
  • तुळशीचे रोप घरात तुम्ही लावू शकता. यामुळे कीटक घरात राहणार नाहीत.
  • याशिवाय घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा किंवा हवेसाठी तुम्ही जाळीदार पडदे लावू शकता.
  • घराच्या आजूबाजूला गवत किंवा झाडी वाढू देऊ नका, कारण यामुळे किटकांचा प्रादुर्भाव वाढतो.
  • घराबाहेरचे दिवे शक्यतो कमी प्रकाशाचे ठेवावेत. कारण दिव्याचा प्रकाश किटकांना आकर्षित करतात.

काय काळजी घ्याल?

  • घराच्या आजूबाजूला आणि घरातील कचरा नियमितपणे स्वच्छ करा. कचरा साठल्याने किटक येतात.
  • घरात किंवा घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. साचलेले पाणी डासांसाठी प्रजनन स्थळ बनू शकते.
  • नियमितपणे घर स्वच्छ करा. विशेष करून स्वयंपाकघर आणि बाथरूम स्वच्छ ठेवा.

 

 

 

हेही पाहा –

Comments are closed.