तो दिवस त्याचाच होता! जयस्वाल आणि स्टार्कमधील वादावर एडम गिलक्रिस्टच्या विधानाने खळबळ!

एडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) सध्या चर्चेमध्ये आहे, कारण गिलक्रिस्टने एक अस वक्तव्य केलं आहे ज्याने चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. माजी ऑस्ट्रेलिया यष्टिरक्षक गिलक्रिस्टने यशस्वी जयस्वालचे (Yashsvi jaiswal) कौतुक करत असे काही म्हटले आहे की, ज्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. स्पोर्ट्सयारी सोबत बोलताना गिलक्रिस्टने यशस्वी जयस्वालला क्रिकेट विश्वातील पुढचा सुपरस्टार म्हटले आहे. त्यासोबतच त्याने जयस्वाल कडून मिचेल स्टार्कबद्दल केलेल्या स्लेजिंगवर देखील भाष्य केले.

एडम गिलक्रिस्टने म्हटले, मला वाटते की, जयस्वाल पुढचा मोठा सुपरस्टार असणार आहे. त्याला थोड अजून शिकण्याची काही गोष्टी व्यवस्थित पद्धतीने शिकण्याची गरज आहे. तसेच मला वाटते, तो ह्या गोष्टी सांभाळून घेईल. स्टार्क आणि जयस्वालमध्ये जे झाले ती चांगलीच वादावादी होती. प्रत्येकाचा स्वतःचा दिवस असतो आणि तो त्याचा दिवस होता.

त्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात त्यांनी दबाव टाकला. त्यानंतर त्या दोघांमध्ये काहीतरी झाले. हीच खेळाची खरी गंमत आहे. पण माझ्या दृष्टीने दोघांमध्ये जे काही झाले ते सर्व चांगले ईमानदार भांडण होते.

यशस्वी जयस्वालने 19 मधील त्याचे 9 कसोटी सामने परदेशात खेळले आहेत. 45 च्या सरासरीने 2 शतके देखील झळकावली आहेत. जयस्वालने वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट खेळले आहे. पण न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये त्याला कसोटी क्रिकेट खेळण्याचा अनुभव नाही.

Comments are closed.