‘मी महिला क्रिकेट खेळण्यास पात्र, पण…’, संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनायाची BCCI आणि ICC कडे मोठी मागणी

टीम इंडियाचा माजी खेळाडू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन याने काही महिन्यांपूर्वी हार्मोनल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर आर्यनने अनाया बांगर हे नाव धारण केले. अनाया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. शस्त्रक्रियेनंतर आपल्या बदललेल्या आयुष्याबद्दल ती अनेक व्हिडीओही शेअर करते. मधल्या काळात तिने अनेक मुलाखतींमध्ये आपला प्रवासही सांगितला होता. या दरम्यान तिने क्रिकेट खेळू न शकल्याची खंतही बोलून दाखवली होती. आता याच बाबतीत तिने बीसीसीआय आणि आयसीसी मोठी मागणी केली आहे.
अनाया बांगर हिने ट्रान्सजेंडर खेळाडूंसाठी मोठी मागणी केली आहे. उघडपणे आपली ओळख सांगणाऱ्या ट्रान्सजेंडर खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती तिने बीसीसीआय आणि आयसीसीकडे केली आहे. सध्याच्या घडीला ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिला क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी नाही. 2023 मधील वर्ल्डकपनंतर आयसीसीने ट्रान्सजेंडर खेळाडूंना क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली होती.
याबाबत आता अनायाने ट्रान्सजेंडर खेळाडू म्हणून आपली लिंगबदल करण्याचा प्रवास सांगणारा 8 पानांचा अहवाल सादर केला आहे. हा व्हिडीओ तिने आयसीसी आणि बीसीसीआयकडेही पाठवला आहे. तिने जानेवारी ते मार्च 2025 या काळात यूकेतील मॅँचेस्टर मेट्रोपॉटिलन युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट येथे 8 आठवड्यांच्या संशोधन शिबिरात सहभाग घेतला होता. या संशोधनामध्ये हार्मोन थेरपीने तिची ताकद, सहनशक्ती, हिमोग्लोबिन, ग्लुकोज पातळी आणि क्रीडा कामगिरीवर कसा परिणआम केला यावर चर्चा करण्यात आली. या संशोधनानंतर अनायाची तुलना ही सिसजेंडर म्हणजेच ज्या जन्मापासून महिला आहेत अशा खेळाडूंशी करण्यात आली.
हार्मोन रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतर अयानाची ग्लुकोजची पातळी, स्नायुंमधील ताकद आणि हिमोग्लोबनची पातळी सिसजेंडर खेळाडूंएवढी किंवा त्याहून कमी आहे, हे संशोधनानंतर स्पष्ट झाले. तिचे शरीरही महिलांच्या दर्जाचे असल्याचे तिने सांगितले. विज्ञानानुसार तिने आपले शरीर महिला क्रिकेट खेळण्यास पात्र असल्याचेही म्हटले. मात्र जग याला मान्यता देईल का? असा सवाल तिने केला. मला सहानुभूती नको आहे, मला तथ्य आणि सत्यावर आधारीत जग हवे आहे असे म्हणत तिने ट्रान्सजेंडलला क्रिकेट खेळता यावे यासाठी बीसीसीआय आणि आयसीसीने ठोस वैज्ञानिक धोरण राबवावे अशी मागणीही तिने केली.
Comments are closed.