NCP’s Suraj Chavan posts video of Bharat Gogawale with Mantrika


दोन दिवसांपूर्वी पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी काही व्हिडीओ आणि फोटो शेअर भरत गोगावले यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केल्याचा दावा केला होता. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा मांत्रिकासोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळेच शिवसेनेत फूट पडल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी काही व्हिडीओ आणि फोटो शेअर भरत गोगावले यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केल्याचा दावा केला होता. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा मांत्रिकासोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. महत्ताचे म्हणजे सूरज चव्हाण यांनी व्हिडीओ पोस्ट करताना पालकमंत्रिपदाचा उल्लेख केला आहे. (NCP’s Suraj Chavan posts video of Bharat Gogawale with Mantrika)

विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेवर आली. मात्र तेव्हापासून आतापर्यंत अद्यापही रायगड जिल्ह्याला अद्यापही पालकमंत्री मिळालेला नाही. कारण रायगडच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र शिवसेना शिंदे गटाने नाराजी व्यक्त केल्यानंतर रायगडच्या पाकलमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धुसफूस सुरू असल्याने अद्यापही रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा मांत्रिकासोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हेही वाचा – Jayant Patil : पक्षांतरासाठीच भेटलो असेल…; भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

सूरज चव्हाण यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, भरत गोगावले फक्त टॉवेलवर एका खुर्चीवर बसलेले आहेत. त्यांच्यासमोर काळे कपडे घातलेला एक मांत्रिक आणि दोन वक्ती भगवी वस्र घालून उभी आहेत. याशिवाय भरत गोगावले यांच्यासमोर असलेल्या टेबलावर काही वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. काळे कपडे घातलेला मांत्रिक भरत गोगावले यांच्यासोबत संवाद साधून काही विधी करताना दिसत आहे. मात्र व्हिडीओमध्ये दोघांमध्ये काय संवाद होतो, हे ऐकू येत नाही. महत्त्वाचे म्हणजे सूरज चव्हाण यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना “बाबा भरतशेठ + आघोरी विद्या = पालकमंत्री?” असे म्हटले आहे. याचा अर्थ रायगडचे पालकमंत्रिपद मिळावे यासाठी भरत गोगावले पूजा करत असल्याचा दावा सूरज चव्हाण यांनी केला आहे.

गोगावले यांनी अघोरी पूजा केली – वसंत मोरे

दोन दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी दावा केला होता की, 18 ऑक्टोबर 2024 रोजी भरत गोगावले यांनी उज्जैन येथील बागलामुखी देवीच्या मंदिरात 11 महाराजांसोबत पूजा केली होती. त्यानंतर त्यांना आपल्या घरी बोलावून पूजा घातली होती. तुमचा तुमच्या कामावर विश्वास नाही का? मग अशा पूजांचा आधार का घेतला? असे प्रश्न उपस्थित करत वसंत मोरे म्हणाले होते की, या पूजेसाठी इतर राज्यातून मांत्रिक बोलावण्यात आले होते आणि त्या पूजांचे व्हिडीओ आमच्याजवळ उपलब्ध आहेत. जर गोगावले यांनी ही गोष्ट नाकारली, तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार दाखल करू, असा इशारा वसंत मोरे यांनी दिला होता. मात्र वसंत मोरे यांच्या आरोपावर भरत गोगावले यांनी अद्यापही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता सूरज चव्हाण यांनी आरोप केल्यावर तरी भरत गोगावले प्रतिक्रिया देणार का? हे पाहावे लागेल.

हेही वाचा – Devendra Fadnavis : वेगवेगळ्या पक्षात न्याय मिळत नसलेल्यांना सोबत घेऊन…; काय म्हणाले फडणवीस?



Source link

Comments are closed.