लीड्स टेस्टमध्ये पाऊस ठरणार का अडथळा? जाणून घ्या कसं असेल हवामान
भारतीय संघ आणि इंग्लंड दोघेही आता लीड्स कसोटीसाठी जोरदार तयारी करत आहेत. हा सामना (20 जून) रोजी हेडिंग्ले मैदानावर खेळला जाईल. क्रिकेट जगतातील सर्वांचे लक्ष या सामन्यावर लागले आहे. लीड्समध्ये सारखा पाऊस पडत असतो, अश्या हवामानाचा या सामन्यावर परिणाम होईल अशी शक्यता आहे. खरा प्रश्न हा आहे की या सामन्यावर पावसाचा परिणाम होणार आहे का.
या सामन्यादरम्यान लीड्समधील हवामान पाहता, पावसामुळे चाहत्यांची मजा खराब होणार आहे. मोठा प्रश्न असा आहे की पावसामुळे संपूर्ण सामना वाहून जाईल की त्याचा थोडासा परिणाम होईल.
सामन्याच्या पहिल्या दिवशी 5 ते 10 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज लीड्समध्ये तापमान 17 अंश तर कमाल तापमान 31 अंश राहण्याची शक्यता आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 60 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दिवशी लीड्समधील तापमान पहिल्या दिवसासारखेच राहणार आहे.
पहिल्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशीही 5 ते 10 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, या दिवशी तापमान 12 अंश ते 22 अंशांच्या दरम्यान असेल. तिसऱ्या दिवशी सामना खेळवता येईल.
सामन्याच्या चौथ्या दिवशी, पाऊस दोन्ही संघांना खूप त्रास देऊ शकतो. या दिवशी 25-30 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दिवशी लीड्समध्ये तापमान 13 अंश ते 19 अंशांपर्यंत असू शकते.
लीड्समध्ये चौथ्या दिवशी तसेच शेवटच्या दिवशी 25-30 टक्के पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, तापमान चौथ्या दिवसासारखेच राहण्याची अपेक्षा आहे
Comments are closed.