भारत-इंग्लंड 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा कोण करणार? हे 5 खेळाडू दावेदार…

हेडिंग्ले: भारत आणि  इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरु होत आहे. या मालिकेतील पहिली कसोटी हेडिंग्ले, लीडसवर होणार आहे. या मालिकेत दोन्ही संघांकडे दमदार फलंदाज आहेत. इंग्लंडकडे जो रुट सारखा दिग्गज खेळाडू आहे. ज्यानं कसोटीत 13000  धावा पूर्ण केल्या आहेत. भारताकडे केएल राहुल सारखा अनुभवी खेळाडू आहे, ज्यानं यापूर्वी इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या मालिकेत रुट की राहुल सर्वाधिक धावा कोण करणार याकडे लक्ष लागलं आहे.  

भारत- इंग्लंड सर्वाधिक धावा करणारे फलंदाज कोण ठरणार? 

1- जो रूट-  इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू जो रुटनं कसोटी क्रिकेटमध्ये 13000 धावा केल्या आहेत. त्यानं जवळपास 150 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत. जो रुट त्याच्या मायदेशात खेळणार आहे. इंग्लंडमधील सर्व खेळपट्ट्यांवर खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. या कसोटी मालिकेत त्याला रोखणं भारतापुढील आव्हान असेल. सर्वाधिका धावा करणाऱ्या खेळाडूंच्या संभाव्य यादीत  जो रुटचा समावेश आहे.  

2- केएल राहुल- भारताचा सलामीवीर के एल राहुलनं गेल्या वेळी इंग्लंडमध्ये दमदार कामगिरी केली आहे. इंग्लंडमध्ये शतक देखील केलं आहे. केएल राहुलनं त्या मालिकेत 300 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. भारतीय संघाला राहुलकडून पुन्हा तशाच कामगिरीची आशा आहे.  

3- बेन डकेट- इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन डकेट यानं कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. कसोटीत आक्रमक फलंदाजीसाठी तो प्रसिद्ध आहे. कसोटीत त्याचा स्ट्राइक रेट 87 टक्के आहे. डकेट या मालिकेत देखील चांगली कामगिरी करु शकतो.  

4- शुभमन गिल- भारतीय कसोटी संघाचा कॅप्टन शुभमन गिलचं इंग्लंडमधील रेकॉर्ड चांगलं नाही. मात्र, शुभमन गिल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये त्यानं शानदार फलंदाजी केली आहे. इंग्लंड विरुद्ध तो फॉर्म कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. 

 
5- यशस्वी जयस्वाल-  भारताचा दुसरा सलामीवीर यशस्वी जयस्वालनं इंग्लंड विरुद्धच्य कसोटी मालिकेत गेल्या वर्षी 700 हून अधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यानं चांगली कामगिरी केलेली होती. आता इंग्लंड दौऱ्यात यशस्वी जयस्वालच्या कामगिरीकडे लक्ष लागलं आहे.

Comments are closed.