Eknath Shinde stated that he wanted both the Ayodhya Ram temple and the removal of Article 370


एकनाथ शिंदे यांनी वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत अयोध्येतील राम मंदिर आणि जम्मू व काश्मीरमधील कलम 370 या दोन्ही मुद्द्यांवर भाष्य केलं.

मुंबई : वरळी येथील एन.एस.सी.आय. डोम येथे शिवसेना शिंदे गटाचा 59 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. याचवेळी त्यांनी दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत अयोध्येतील राम मंदिर आणि जम्मू व काश्मीरमधील कलम 370 या दोन्ही मुद्द्यांवर भाष्य केलं. (मराठी stated that he wanted both the Ayodhya Ram temple and the removal of Article 370)

देशद्रोह्यांची देशभक्तांशी तुलना करणे हे तुमचे हिंदुत्व आहे का? ‘हनुमान चालीसा’ म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकले, हे तुमचे हिंदुत्व होते का? असे प्रश्न उपस्थित करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, बाळासाहेबांचे स्वप्न होते की, अयोध्येत राम मंदिर बांधावे आणि जम्मू व काश्मीरमधील कलम 370 हटवावे. बाळासाहेब म्हणायचे, मला एक दिवस पंतप्रधान करा, ही दोन्ही कामे मी करेन. ही दोन्ही कामं कोणी केली? असा प्रश्न उपस्थित करत एकनाथ शिंदे म्हणाले की, ही दोन्ही कामं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केली. परंतु बाळासाहेबांचे स्वप्न साकार करणाऱ्यांना शिव्या आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कायम दूर ठेवले, त्या काँग्रेसच्या नावाने ओव्या गाता! हे कसले तुमचे हिंदुत्व आहे? असा प्रश्नही उपस्थित करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली.

हेही वाचा – Uddhav Thackeray : ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या; गोंधळ झाल्यावर उद्धव ठाकरेंनी भाषण थांबवलं

हिंदुत्वाची आम्ही कधीही प्रतारणा करणार नाही

उद्धव ठाकरेंवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसचा विरोध केला, त्याच काँग्रसेच्या दावणीला शिवसेनेला बांधण्याचं काम या लोकांनी केलं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी झाले लाचार ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही आम्ही तडजोड करणार नाही. हिंदुत्वाची आम्ही कधीही प्रतारणा करणार नाही, असे वचन देतो. परंतु काही लोकांना निवडणुका आल्यावर कार्यकर्त्यांची आठवण येते. एरव्ही “हम दो हमारे दो” असे म्हणत शिंदेंनी टीका केली.

हेही वाचा – Shinde VS Thackeray : ठाकरे म्हणाले, कम ऑन किल मी; शिंदे म्हणतात, इंग्लिश पिक्चर बघून आले वाटतं



Source link

Comments are closed.