ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. लेखक, संगीत दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख होती. त्यांनी विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. विवेक लागू हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. तर अभिनेत्री-लेखिका मृण्मयी लागू ही त्यांची मुलगी आहे. उद्या 20 जून रोजी सकाळी 11 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. विवेक लागू यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या गाजलेल्या कलाकृतींविषयी बोलायचे झाल्यास, टीव्ही चित्रपट ‘गोदावरीने काय केले’ (2008), ‘अग्ली’ (2013), ‘व्हॉट अबाउट सावरकर’ (2015), ‘31 दिवस’ (2018) आदी कलाकृतींचा उल्लेख करावा लागेल.
Comments are closed.