Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray, taking Balasaheb’s name


शिवसेना शिंदे गटाच्या वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबानंतर तुम्ही मराठी माणसांसाठी काय केलं? असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंकडे हिशोब मागितला आहे.

मुंबई : दोन्ही शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन सोहळा आज मुंबईत पार पडत आहे. शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा षण्मुखानंद सभागृहात पार पडत आहे, तर शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा वरळी येथील एन.एस.सी.आय. डोम येथे होते आहे. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
बाळासाहेबांनंतर मराठी माणसांसाठी तुम्ही काय केलं? असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. (मराठी criticizes Uddhav Thackeray, taking Balasaheb’s name)

भाषणाला सुरुवात केल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, आपला मेळावा हा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे, तर दुसरा मेळावा हा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे. कारण हिंदुत्वाचा भगवा, शिवधनुष्य आणि जनतेचा आशिर्वाद आपल्याकडे आहे. आपल्या पक्षात जी वाढ होतेय, ही सर्वांच्या मेहनीची आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण याचेच हे प्रतिबिंब आहे, असे शिंदे म्हणाले.

हेही वाचा – Uddhav Thackeray : ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या; गोंधळ झाल्यावर उद्धव ठाकरेंनी भाषण थांबवलं

उद्धव ठाकरेंवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसचा विरोध केला, त्याच काँग्रसेच्या दावणीला शिवसेनेला बांधण्याचं काम या लोकांनी केलं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी झाले लाचार ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही आम्ही तडजोड करणार नाही. हिंदुत्वाची आम्ही कधी प्रतारणा करणार नाही, असे वचन देतो. परंतु काही लोकांना निवडणुका आल्यावर कार्यकर्त्यांची आठवण येते. एरव्ही “हम दो हमारे दो” असे म्हणत शिंदेंनी टीका केली.

हिंदुत्व आमचा श्वास

बाळासाहेबानंतर तुम्ही मराठी माणसांसाठी काय केलं? असा प्रश्न विचारत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे हिशोब मागितला. तसेच एकनाथ शिंदे म्हणाले की, आता तुम्ही म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, मग बाळासाहेबांना तुम्ही आता हिंदूहृदयसम्राट का म्हणत नाही? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करत एकनाथ शिंदे हिंदुत्व आमचा श्वास असल्याचे वक्तव्य केले.

हेही वाचा – Politics : मातोश्रीवर रोज एका बंगाली बाबाचा वावर, उद्धव ठाकरे त्यांचं जास्त ऐकतात; शिंदे गटाची टीका



Source link

Comments are closed.