Bone Health : या 5 सवयींमुळे हाडे होतील खिळखिळी
शरीराची हाडे आणि स्नायू मजबूत असले की, शरीर निरोगी राहते. पण, जर शरीराच्या कोणत्याही अवयवात समस्या असतील तर अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधी सुरू होतात. त्यामुळे शरीर तंदुरूस्त, निरोगी आणि चपळ राहण्यासाठी हाडे मजबूत असणे गरजेचे आहे. कारण हाडेचं जर कमकुवत असतील तर उठताना, बसताना आणि चालताना त्रास होतो. त्यामुळे हाडे निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार आणि योग्य सवयी अंगी बाळगणे गरजेचे आहे. आज आपण अशा काही सवयी आणि पदार्थ जाणून घेणार आहोत, ज्यामुळे हाडे खिळखिळी होतात.
मीठाचे अतिसेवन – मीठाचे अतिसेवन हाडांसाठी हानिकारक आहे. अनेक जणांना जेवणात जास्त मीठ खाण्याची सवय असते, जी तुम्ही कमी करायला हवी. कारण जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्याने कॅल्शियम मूत्रामार्गे बाहेर टाकले जाते, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात.
कोल्ड ड्रिंक – जास्त प्रमाणात कोल्ड ड्रिंक्सचे सेवन हाडे कमकुवत करणारे ठरते. त्यामुळे निरोगी हाडांसाठी कोल्ड ड्रिंक्स पिणे टाळावे.
शारीरिक हालचाली न करणे – बैठी जीवनशैली असल्याने शरीराची हालचाल होत नाही. ज्यामुळे हाडांवर परिणाम होऊन हाडे कमकुवत होत आहेत. त्यामुळे हाडे निरोगी राहण्यासाठी दररोज योगा, व्यायाम करणे आवश्यक आहे.
अल्कोहोल मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. कारण जेव्हा जास्त प्रमाणात मद्यपान केले जाते तेव्हा हाडे कॅल्शियम शोषण्याची क्षमता गमावतात आणि कमकुवत होतात.
झोपेचा अभाव – अपूर्ण झोप हाडे कमकुवत करू शकते. जर तुम्हाला रात्री उशिरापर्यंत जागायची सवय असेल तर ती आजच बंद करा.
हेही पाहा –
Comments are closed.