आगामी कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बदलला, टेम्बा बावुमा संघाबाहेर!

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्व टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना खेळला गेला (WTC Final 2025 SA vs AUS). या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने टेम्बा बावुमाच्या (Temba Bavuma) नेतृत्वात शानदार खेळी केली आणि 5 विकेट्सने सामना त्यांच्या नावावर केला. आता दक्षिण आफ्रिका संघाच्या नजरा विश्व टेस्ट चॅम्पियनशिप 2025- 27 चक्रावर असतील. संघ या चक्रामध्ये सर्व कसोटी सामन्यात शानदार प्रदर्शन करून पुन्हा फायनल सामन्यात स्थान बनवण्याचा प्रयत्न करेल. पण सध्या आगामी कसोटी मालिकेआधी कर्णधार टेम्बा बावुमा संघातून बाहेर झाला आहे.

विश्व टेस्ट चॅम्पियनशिप फायनल दरम्यान टेम्बा बावुमाला झाली होती तो हॅमस्ट्रिंग समस्येने अडचणीत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावादरम्यान फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती. दुखापत किती गंभीर आहे हे चेक करण्यासाठी त्याचे स्कॅनिंग करावे लागेल. अशा परिस्थितीत झिम्बाब्वे विरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी कर्णधार बाहेर झाला आहे. त्याच्या जागी संघात अनुभवी फिरकी गोलंदाज केशव महाराज (Keshav Maharaj) याला कर्णधार बनवण्यात आले आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका 28 जून पासून सुरु होणार आहे, ज्याचा शेवटचा सामना 6 जुलै रोजी खेळला जाईल.

झिम्बाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघाने काही युवा खेळाडूंना संधी दिलेली आहे. आयपीएल 2025 मध्ये चेन्नई कडून शानदार प्रदर्शन केलेल्या डेवाल्ड ब्रेव्हिसला सुद्धा या संघात संधी मिळाली आहे. त्याने आयपीएल शिवाय दक्षिण आफ्रिका अंडर 19 संघांमध्ये शानदार कामगिरी केलेली आहे.

Comments are closed.