छत्तीसगडच्या चकमकीत मारल्या गेलेल्या मादी नॅक्सल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
छत्तीसगडमधील कांकेर येथे शुक्रवार, 20 जून रोजी सकाळी सुरक्षा जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. या संघर्षात एका महिला नक्षलवादीचा खात्मा करण्यात आला आहे. कांकेर जिह्यातील छोटेबाथियाच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे पोलीस अधीक्षक इंदिरा कल्याण एलिसेला यांनी सांगितले. सुरक्षा दलांनी महिला नक्षलीचा मृतदेह हस्तगत केला आहे. तसेच चकमकीनंतर सुरक्षा दलांनी शस्त्रेदेखील जप्त केली आहेत.
शुक्रवारी झालेल्या चकमकीवेळी सुमारे 15 ते 20 नक्षलवादी घटनास्थळी उपस्थित होते. सुरक्षा जवानांचा मागमूस लागताच त्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. सायंकाळी मोहीम पूर्ण करून सैनिक सुरक्षितपणे परत आले आहेत. डीआरजी आणि बीएसएफची संयुक्त टीम शोध मोहिमेत सामील झाली होती. या चकमकीनंतर परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेमुळे बस्तर प्रदेशात नक्षलवादी अजूनही कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे. जानेवारी 2025 पासून येथे 213 नक्षलवादी मारले गेले आहेत. बस्तर परिसर हा बऱ्याच काळापासून नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानला जात आहे. परंतु आता सरकार बळाचा वापर करून आणि विकास कामांद्वारे दशकांपासून सुरू असलेला नक्षलवाद संपवू पाहत आहे.
Comments are closed.