आता थांबायचं नाय… नीरज चोप्रानं प्रतिष्ठेची पॅरिस डायमंड लीग स्पर्धा जिंकली, ज्युलियन वेबरचा बदला घेतला

हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता नीरज चोप्रा याने पॅरिस डायमंड लीग स्पर्धा जिंकली आहे. फ्रान्सच्या स्टेड सेबास्तियन येथे पार पडलेल्या या स्पर्धेत नीरज चोप्रा याने 88.16 मीटर भाला फेकत अव्वल स्थान पटकावले.
आठ वर्षांनंतर नीरज या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या पॅरिस टप्प्यात आपले कौशल्य पणाला लावण्यासाठी उतरला होता. त्याच्यापुढे जर्मनीच्या ज्युलियन वेबर याचे तगडे आव्हान होते. गेल्या दोन स्पर्धांमध्ये दोघांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळाली होती आणि नीरजवर वेबर भारी पडला होता. मात्र यावेळी नीरजने बदला घेत स्पर्धेवर मोहोर उमटवली.
नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग जिंकला.
वाचा @ानी कथा | https://t.co/5ywo9fwqqn#नेराजचोप्रा #Diamondleag #जॅव्हलइनथ्रो pic.twitter.com/qvli6njwxu
– किंवा डिजिटल (@anian_digital) 20 जून, 2025
Comments are closed.