अजितदादांनी राज्याचे सारथ्य करावे, हे पांडुरंगाकडे साकडं, अमोल मिटकरींच्या विधानाने चर्चेला ऊत
अमोल मिटकरी: माळेगाव कारखाना अजितदादांनी (Ajit Pawar) जिंकावा आणि पुढच्या वर्षी महापूजेला दादांनी सपत्नीक यावे, हे साकडे विठ्ठलाला घातल्याचे अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सांगितले. शिवाय हे कसं घडणार, काय राजकीय बदल घडणार याबाबत विचारले असता ते म्हणाले की, सध्या जी काय राजकीय उलथापालत होईल ती मर्जी पांडुरंगाची, असे उत्तर देत आमदार अमोल मिटकरी यांनी संभ्रम वाढवला आहे. मात्र या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
अजितदादा यांनी राज्याचे सारथ्य करावे, ही माझी पांडुरंगापाशी इच्छा- अमोल मिटकरी
कोणी देवाला काय साकडे घालायचे हे त्याचा वैयक्तिक विषय असून मी फक्त अजितदादा यांनी राज्याचे सारथ्य करावे, ही माझी इच्छा पांडुरंगापाशी व्यक्त केली. आता ते कसं होईल ही पांडुरंगाची मर्जी, असे सांगत अमोल मिटकरी यांनी भाष्य केलंय. माळेगाव कारखाना अजितदादांनी मोठ्या मताने जिंकावा, असे साकडे घातल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वीही अमोल मिटकरी यांनी अजित दादा पुढच्या वर्षी आषाढीच्या पूजेला येतील, अशी विधाने केली होती. एक वर्षात नेमकी काय राजकीय बदल घडतील याबाबत मात्र त्यांच्यापाशी कोणतेही उत्तर नसले तरी हे घडवण्याची मर्जी पांडुरंगाची असल्याचे संकेत ते देत आहेत. दरम्यान, भाजप मंत्री नितेश राणे आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांच्यातील ट्विटर वार वर टोलेबाजी करताना ‘हिंदू खतरे मे है’ असे म्हणणारे नितेश राणे यांनी राम आणि भरत या सावत्र भावांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तरी सुद्धा पुरेसे आहे, असा टोला लगावला.
Malegaon Karkhana Election : माळेगाव कारखान्यासाठी रविवारी मतदान
माळेगाव साखरकारखाना निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नीळकंठेश्वर पॅनेल, ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या पक्षाचे बळिराजा सहकार बचाव पॅनेल, चंद्रराव तावरे- रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनेल, असे चार पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.