International Yoga Day 2025: नियमित योगा का करावा?
आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून आज ( International Yoga Day) साजरा केला जातो. आज जगभरात योगाशी संबंधित विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. खरं तर, योग हा भारताने जगाला दिलेला अमूल्य वारसा आहे. निरोगी शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी योगा खूप महत्त्वाचा असतो. नियमित योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. यामुळे शरीरातील ताण कमी होतो, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि एकाग्रता सुधारते. यासोबतच, योगामुळे चांगली झोप लागते, ऊर्जा वाढते आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळतो. आज आपण जाणून घेऊयात, नियमित योगा करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरते.
नियमित योगा करण्याचे फायदे –
शारीरिक फायदे –
- नियमित योगामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, ज्यामुळे शरीरा विविध आजारांशी लढण्यासाठी तयार होते.
- योगामुळे रक्तदाब नियंत्रित होतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
- योगासनांमुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात, ज्यामुळे शरीराला बळकटी मिळते.
- शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर योगा करावा.
- योगामुळे शरीराची लवचिकता वाढते, ज्यामुळे शरीराला अधिक सहजतेने आणि आरामात हालचाल करता येते.
- योगामुळे मज्जासंस्था उत्तेजित होते, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते.
- पचनाच्या तक्रारींनी कंटाळले असाल तर योगा करावा. यामुळे पोटाच्या तक्रारी कमी होण्यास मदत होईल.
- योगामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात, ज्यामुळे शरीर शुद्ध होते.
- योगाच्या नियमित सरावाने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे शरीराच्या सर्व भागांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो.
मानसिक फायदे –
- तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी योगाचा सराव करावा, ज्यामुळे मानसिक शांती मिळते.
- योगामुळे एकाग्रता सुधारते,ज्यामुळे कामावार लक्ष केंद्रित करणे सोपे होते.
- योगामुळे चांगली झोप लागते.
- सकारात्मक दृष्टीकोन होण्यासाठी योगाचा सराव करावा.
- योगामुळे आत्मविश्वास वाढतो, ज्यामुळे आपण अधिक सक्षम होतो.
- योगामुळे राग आणि नैराश्य कमी होऊन मन शांत होते.
हेही पाहा –
Comments are closed.