८०० कोटी कमाई करणाऱ्या चित्रपटाला ‘हाऊसफुल ५’ने टाकले मागे, अक्षय कुमारने हॉलिवूडलाही चारली धूळ – Tezzbuzz

‘जॉन विक’ या फेमस एक्शन चित्रपटाचा स्पिनऑफ असलेला ‘बॅलेरिना’ हा हाॅलिवूड चित्रपट जगभरात फक्त एका अठवड्यात शेकडाे काेटींचा व्यवसाय करुन गेला आहे. पण इतकं सगळ असून सुद्धा हा चित्रपट अक्षय कुमार च्या धमाल काॅमेडी ‘हाउसफुल 5’ च्या मागेच राहिला! ‘बॅलेरिना’ ने आतापर्यंत किती कमवलं आहे; आणि एवढं कमवूनसुद्धा हा चित्रपट अक्षय कुमारच्या धमाल काॅमेडी फिल्मपेक्षा कसा आणि कुठे मागे पडला.

‘बॅलेरिना’ ने भारतात गेल्या 6 दिवसांत अजून 9 काेटाेंची कमाईसुद्धा केलेली नाही. हाती आलेल्या माहितीनुसार, 7व्या दिवशी सकाळी 10:30 पर्यंत या चित्रपटाने फक्त 9.21 काेटींचीच कमाई केली आहे. या एक्शन चित्रपटाचं शूटिंग जवळपास ९० मिलीयन डाॅलर्समध्ये केलं गेलं आहे. या चित्रपटाने आता पर्यंत जगभरात सुमारे 92.8 मिलीयन डाॅलर्स, म्हणजेच जवळपास 805 काेटी रूपयांची कमाई केली आहे.

‘हाउसफुल 5’ ने आतापर्यंत जगभरात 252.50 काेटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, याच्या तित्पट कमाई करणारी हाॅलीवूडची ‘बॅलेरिना’ भारतात मात्र कुठेच चालत नाहीये. जिथे अक्षय कुमारचा चित्रपट दाेन आठवडे झाले तरी राेज 3-4 काेटी रुपये कमवत आहे, तिथे ‘बॅलेरिना’ सारखी ढाईपट बजेटची फिल्म भारतात प्रेक्षकांच्या खेचू शकलेली नाही. सुरवातीचे ३ दिवस साेडले, तर या चित्रपटानं एकदाही 1 काेटी रुपयांची कमाई केली नाही.

या चित्रपटात ‘जॉन विक चैप्टर 4’ नंतर कीनू रीव्स पुन्हा एकदा जॉन विकच्या रोलमध्ये दिसतोय. आणि अ‍ॅना डी अरमास ही या चित्रपटाची मुख्य हिरोईन आहे. हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत जबरदस्त अ‍ॅक्शनने भरलेला आहे, थरार आणि फाइट्सने सगळी मजा आणली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशचे झाले ब्रेकअप?; अभिनेत्रीने दिले उत्तर
काजोलसारख्या लोकप्रिय अभिनेत्रीला PR का हवा? अभिनेत्रीने सांगितले धक्कादायक कारण

Comments are closed.