Sanjay Raut resply to Amit Shah who called Eknath Shinde Group the real Shiv Sena
खरी शिवसेना कोणची याचा परिचय एकनाथ शिंदे यांनीच करुन दिल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (ता. 20 जून) एका भाषणात म्हटले. पण त्यांच्या या विधानवर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई : खरी शिवसेना कोणाची यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सतत आरोप प्रत्यारोप सुरु असतात. अशातच आता यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उडी घेतली आहे. खरी शिवसेना कोणची याचा परिचय एकनाथ शिंदे यांनीच करुन दिल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (ता. 20 जून) एका भाषणात म्हटले. पण त्यांच्या या विधानवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. अमित शहांना फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते महाराष्ट्रात मराठी माणसांच्या जखमांवरील खपली काढण्यासाठीच येतात, असे राऊतांनी म्हटले आहे. इतकं काही करूनही शिवसेना उभी आहे, त्यामुळे शहा फ्रस्ट्रेट झाले आहेत, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. (Sanjay Raut resply to Amit Shah who called मराठी Group the real Shiv Sena)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता. 21 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खऱ्या शिवसेनेबाबत केलेल्या विधानाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी याबाबत ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचा परिचय अमित शहांपेक्षा आम्हाला जास्त आहे. शिंदेंचा गट खरी शिवसेना असे म्हणणे म्हणजे अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष रामदास आठवले यांचा आहे असे म्हणण्यासारखे आहे. त्यामुळे अमित शहा यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते मुंबईत येतात आणि अशा प्रकारची विधान करतात. महाराष्ट्राच्या जखमेवर, मराठी माणसाची जी एकजूट फोडण्याचा प्रयत्न केला त्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी ते महाराष्ट्रात येतात आणि त्यांच्या अवती भोवतीची बेइमान मराठी माणसे टाळ्या वाजतात, याचे आपल्याला दु:ख वाटत असल्याची भावना राऊतांनी व्यक्त केली.
हेही वाचा… CM Fadnavis : सरकार शब्द फिरवणार नाही, शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक विधान
तसेच, अमित शहा यांनी पुन्हा अशा प्रकारचे वक्तव्य करून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला आहे. मराठी एकजुटीचा, मराठी माणसाचा अपमान केला. एकनाथ शिंदे यांचा गट हा अमित शहांच्या मालकीचा आहे. आम्ही शहांचे बुटचाटे आहोत हे शिंदेंनी वारंवार सिद्ध केले आहे. त्याच्यामुळे शहा अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर इतके करूनही शिवसेना उभी आहे हे त्याचे फ्रस्ट्रेशन आहे. एकनाथ शिंदे यांनी काय सिद्ध केले? शिंदेंची ओळख ही ओळख लिंबू-मिरची उपमुख्यमंत्री आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला. त्यामुळे आता राऊतांच्या या टीकेला शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments are closed.