राजा रघुवंशी हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सोनमच्या मिस्ट्री फ्रेंडचं नाव समोर, सगळं प्रकरणच फिरल
सोनम रघुवन्शी गूढ मित्र अल्का: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रकरणातील सस्पेन्स अधिकच वाढत चालला आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीची जवळची मैत्रीण ‘अलका’ हिच्या एन्ट्रीनंतर एक नवीन संशय निर्माण झाला आहे. सोनमच्या आईने आणि राजा रघुवंशीच्या कुटुंबाने पोलिसांकडे मागणी केली आहे की, सोनमच्या सर्व जवळच्या मैत्रिणी आणि तिच्यासोबत काम करणाऱ्या मुलींची कसून चौकशी करावी. त्यांच्या चौकशीनंतर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता कुटुंबाला आहे.
कोण आहे ती गूढ मिस्ट्री गर्ल अलका?
या प्रकरणात ज्या ‘अलका’ नावाच्या मुलीचा उल्लेख केला जात आहे ती सोनमची जवळची मैत्रीण असल्याचे मानले जाते. सोनमच्या ‘अलका’ नावाच्या मैत्रिणीचं नाव समोर आल्याने एक वेगळाच संशय निर्माण झाला आहे. राजा रघुवंशीचे कुटुंब या दोघींच्या मैत्रीकडे संशयाने पाहत आहे आणि पोलिसांकडून अशी मागणी करत आहे की अलकासह सोनमच्या जवळच्या सर्व मैत्रिणींची चौकशी करून सत्य बाहेर आणले पाहिजे.
आतापर्यंत या प्रकरणात कोणती माहिती समोर
राजा रघुवंशी याची 23 मे रोजी हत्या करण्यात आली आणि 2 जून रोजी त्याचा मृतदेह सापडला. हत्येच्या 17 दिवसांनंतर सोनम पोलिसांसमोर शरण आली, त्यानंतर इतर चार आरोपींनाही अटक करण्यात आली. या हत्येने केवळ इंदूरमध्येच नाही तर देशभरात खळबळ उडाली. आता मिस्ट्री गर्ल अलकाच्या प्रवेशामुळे या प्रकरणात आणखी वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाला असा संशय आहे की, सोनमने हा गुन्हा एकटीने केला नसेल. पोलीस आता या प्रकरणाकडे केवळ प्रेम प्रकरण किंवा वैयक्तिक शत्रुत्व म्हणून पाहत नाहीत तर यात खोलवरचा कट असण्याची शक्यताही तपासत आहेत. येत्या काळात अलका आणि सोनममधील मैत्रीबाबत धक्कादायक खुलासे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
मेघालय पोलिसांच्या विशेष तपास पथकाने हत्येच्या ठिकाणी पुन्हा क्राइम सीन उभा करून परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला आहे. याशिवाय इंदूरमध्ये पीडित व आरोपीच्या दोन्ही कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली आहे.तपासात सध्या प्रेमाचा त्रिकोण हा महत्त्वाचा धागा मानला जात असला तरी, पोलिसांनी इतर शक्यतांवरही लक्ष केंद्रीत केलं आहे. पोलिस अधीक्षक विवेक सी.एम. यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक वाद हे देखील या गुन्ह्यामागील महत्त्वाचे पैलू असू शकतात,” अशी शक्यता नाकारता येत नाही.
या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या दोन हत्यारांपैकी एक हत्यार पोलिसांच्या ताब्यात आले आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम हिचा मोबाईल फोन अद्याप सापडलेला नाही. पोलिसांनी सांगितले की, “या फोनमध्ये अनेक महत्त्वाचे पुरावे आणि धागेदोरे असण्याची शक्यता आहे.” दरम्यान, सोनमने आपल्या कथित प्रियकराच्या मदतीने ही हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, तिच्या इतर संबंधांबाबत, मागील आर्थिक व्यवहारांबाबत आणि कुटुंबाशी असलेल्या ताणतणावाबाबतही तपास सुरु आहे. हत्येची पार्श्वभूमी, पुरावे, मोबाईल डेटाची माहिती आणि इतर संदिग्ध व्यक्तींचा संबंध या सर्व गोष्टींचा समावेश करून मेघालय पोलीस हे प्रकरण उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.