IND vs ENG: लीड्समध्ये रिषभ पंतने रचला इतिहास! धोनीचा रेकॉर्ड मोडत केला मोठा पराक्रम

Ish षभ पंत रेकॉर्डः भारत आणि इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताने प्रथम फलंदाजी करताना धावांचा पाऊस पडला. त्याच वेळी उपकर्णधार रिषभ पंतने आपल्या आक्रमक फलंदाजीने चाहत्यांचे भरभरून मनोरंजन केले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या पंतने आपल्या खास शैलीत इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. पंतसमोर इंग्लंडचा प्रत्येक गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ वाटत होता. पंतने कर्णधार शुबमन गिलसोबत चौथ्या विकेटसाठी आतापर्यंत 138 धावांची भागीदारी केली आहे. या खेळीत पंतने मोठा टप्पा गाठला असून त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

पाचव्या क्रमांकावर आलेल्या पंतने क्रीजवर आल्यावर लगेचच बेन स्टोक्सला दमदार चौकार मारत गोलंदाजांना इशारा दिला. पंतने तडाखेबाज अंदाजात खेळ करत आपले अर्धशतक पूर्ण केले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत पंत 102 चेंडूंमध्ये 65 धावा करत नाबाद आहे. या खेळीत त्याने 6 चौकारांसह 2 गगनचुंबी षटकार ठोकले. या कामगिरीदरम्यान पंतने कसोटीत 3,000 धावा पूर्ण केल्या असून तो कसोटीत सर्वात जलद 3,000 धावा करणारा आशियाई यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याने हा टप्पा केवळ 76व्या डावात पूर्ण केला. (Pant breaks MS Dhoni record)

रिषभ पंत आता सेना देशांमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा यष्टिरक्षक फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. सेना देशांमध्ये धोनीने 1,731 धावा केल्या होत्या, मात्र पंत आता त्यापेक्षा अधिक धावा करत पुढे गेला आहे. (Pant most runs by Indian keeper in SENA countries)

लीड्समध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांचा जबरदस्त दबदबा पाहायला मिळाला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने भारताला शानदार सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी रचली. राहुलने 42 धावा केल्या, तर यशस्वीने 101 धावांची जबरदस्त खेळी केली. नंबर तीनवर आलेला साई सुदर्शन अपयशी ठरला. तो शून्यावर तंबूत परतला. त्यानंतर शुबमन गिल आणि जयस्वालने डाव सावरला आणि तिसऱ्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी रचली. गिल आणि यशस्वीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने दुसऱ्या सत्रात एकही विकेट गमावली नाही. यशस्वी बाद झाल्यानंतर गिल आणि पंतने आक्रमक फलंदाजी करत चौथ्या विकेटसाठी 138 धावा जोडल्या आहेत. दरम्यान गिल 127 तर पंत 65 धावांवर नाबाद आहे. (IND vs ENG Test updates)

Comments are closed.