IND vs ENG: ‘खालीच थांब’, गिलच्या आक्रमक खेळीवर पंतची चकित करणारी सूचना!
विस्फोटक यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishbh Pant) वेळेनुसार त्याच्या खेळामध्ये चांगला बदल घडवताना दिसत आहे. त्याने सावधानीने खेळत भारतीय संघाला हळूहळू पुढे नेले. यादरम्यान त्याने साथीदार खेळाडूच्या खेळण्यावर देखील बारीक लक्ष ठेवले. सोशलमीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गिलने एक अडचणीत टाकणारा शॉट खेळला त्यानंतर रिषभ पंतने त्याला समजावले.
वर्ल्ड क्रिकेटमध्ये शानदार पद्धतीने खेळताना रिषभ पंत वेगळ्या अंदाजात खेळताना दिसला. पंतचा हा वेगळा अंदाज इंग्लंड संघातील फिरकी गोलंदाज शोएब बशीरच्या षटकात पाहायला मिळाला. इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांने शुबमन गिलच्या (Shubman Gill) समोर फुल टॉस चेंडू टाकला, ज्याला भारतीय कर्णधाराने क्रिजच्या बाहेर शॉट कव्हर दिशेला खेळला. रिषभ पंतला त्याचा हा अडचणीत टाकणारा शॉट अजिबात आवडला नाही. त्याने गिलला सांगितले, जिथे गरज नाही तिथे जोखीम घेऊ नको.
पंतने गिलला सल्ला दिला, खालीच थांब. फिल्डरच्या हातात गेला असता तर, त्याने झेल पकडण्यासाठी हात उचलला होता. पंतने दिलेल्या सल्ल्यानंतर गिल सांभाळून खेळताना दिसला आणि तो त्याच्या कसोटी करिअरमध्ये सहावं शतक झळकावण्यात यशस्वी ठरला.
चेतावणी: कधी @Rishabhpant17संपावर, विकेट्स दरम्यान काही सल्ला आणि भरपूर बडबड करा! 😜🎙
आता पहा 👉 https://t.co/pxexakeyoj #ENGVIND | 1 ला चाचणी | आता जिओहोटस्टारवर थेट pic.twitter.com/v53iqpg8cm
– स्टार स्पोर्ट्स (@स्टार्सपोर्ट्सडियाडिया) 20 जून, 2025
पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर टीम इंडिया 85 षटकांच्या समाप्तीनंतर तीन विकेट गमावून 359 धावांवर आहे. शुबमन गिल (127), रिषभ पंत (65) धावा करून नाबाद आहेत. तसेच बाद झालेले खेळाडू के एल राहुल (Kl Rahul) 42 आणि यशस्वी जयस्वाल (101) धावा तसेच साई सुदर्शन 00 धावेवर बाद आहे.
Comments are closed.