World Music Day 2025 : का साजरा होतो संगीत दिन?
संगीत ऐकायला सर्वानाच आवडते. संगीत ऐकल्याने मनाला शांती मिळते. प्रवासात तर आपण असे अनेकजण बघतो, जे कानात इअरफोन घालून संगीत ऐकताना दिसतात. खरं तर संगीत म्हणजे आत्माला स्पर्श करणारी एक भावना आहे. हीच भावना व्यक्त करण्यासाठी आणि संगीत, कलाकारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 जून रोजी जागतिक संगीत दिन (World Music Day) साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील संगीतप्रेमींसाठी खास असतो. या दिनानिमित्त जगभरात संगीतमय कार्यक्रम, स्ट्रीट कॉन्सर्ट्स सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. जाणून घेऊयात आजच्या लेखातून या दिनाचा इतिहास, महत्त्व काय आहे,
संगीत दिनाची सुरूवात कशी झाली ?
जागतिक संगीत दिन साजरा करण्याची कल्पना प्रथम 1981 साली फ्रान्समध्ये मांडण्यात आली. तत्कालीन सांस्कृतिक मंत्री मौरिस फ्ल्यूरेट यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. पुढे जॅक लंग यांच्या सहकार्याने 21 जून 1982 रोजी फ्रान्समध्ये पहिल्यांदा ‘फेटे द ला म्युझिक’ हा कार्यक्रम घेण्यात आला. पहिल्यांदाच पार पडलेली ही संकल्पना इतकी लोकप्रिय झाली की, अल्पावधीतच संपूर्ण युरोप आणि हळहळू जगभर पसरली.
32 देशांकडून मिळाला पाठिंबा
जेव्हा पहिल्यांदा जागतिक संगीत दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा जवळपास 32 देशांकडून पाठिंबा मिळाला.
यंदाची थीम काय?
दरवर्षी जागतिक संगीत दिनी एक विशेष थीम जाहीर केली जाते. या वर्षाची थीम ही ‘Healing Through Harmony’ संगीत ताण कमी करण्यास आणि सामाजिक ऐकतेला प्रोस्ताहन देण्याच्या क्षमतेवर भर देते, अशी आहे.
संगीताचे महत्त्व –
हा दिवस संगीताचे महत्त्व सांगण्यासाठी आणि त्याचा प्रचार करण्यासाठी साजरा केला जातो. संगीत आनंद, शांती, एकता, प्रेमाला प्रोत्साहन देते. संगीत ऐकल्याने मूड चांगला होता. संगीतामुळे रक्तदाब नियंत्रित होतो, ज्यामुळे झोप सुधारते.
कुठे साजरा होतो संगीत दिन?
भारत, इटली, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन, पेरू, ब्राझील, इक्वेडोर, मेक्सिको, कॅनडा यासारख्या अनेक देशांमध्ये जागतिक संगीत दिन साजरा केला जातो.
हेही पाहा –
Comments are closed.