IND vs ENG: ‘स्टुपिड’ पासून ‘सुपर्ब’ पर्यंतचा प्रवास, एकेकाळी टीका करणारे गावस्कर आता रिषभ पंतचे चाहते!

टीम इंडिया (Team india) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती जिथे स्टार फलंदाजांची खूप खराब पद्धतीची त्याची कामगिरी होत होती आणि सर्व फलंदाज रिषभ पंत कडून आशा ठेवून होते. त्यावेळी रिषभ पंतने खराब शॉट खेळून त्याची विकेट गमावली, ज्याला पाहून माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर (Former team india captain Sunil Gavaskar) त्यांचा राग आवरू शकले नाहीत आणि ते रिषभ पंत वर भडकले होते. आता इंग्लंड विरुद्ध शानदार फलंदाजी करून रिषभ पंतने गावस्कर यांना त्याचे कौतुक करण्यासाठी भाग पाडले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तेव्हा रिषभ पंतने 28 धावा केल्या होत्या, त्यावेळी सर्वांना त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती पण तसे झाले नाही. 28 धावांवर रिषभ पंत खराब शॉट खेळून बाद झाला. ज्यावेळी कॉमेंट्री पॅनलमध्ये बसलेले दिग्गज सुनील गावस्कर यांनी म्हटले होते, स्टुपिड, स्टुपिड स्टुपिड! त्याने त्या भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले नाही पाहिजे, त्याने दुसऱ्या ड्रेसिंग रूममध्ये जायला हवे. आज जेव्हा इंग्लंड विरुद्ध त्याने शानदार अंदाजात फलंदाजी करत शतक झळकावले, तेव्हा याच सुनील गावस्करांनी रिषभ पंतचे कौतुक करत म्हटले, अतिशय शानदार, शानदार, शानदार!

आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये रिषभ पंतला लखनऊने 27 करोड रुपयांना खरेदी केले होते, जिथे कर्णधार आणि फलंदाज म्हणून रिषभ पंत फेल ठरला. ज्या कारणाने पूर्ण दोन महिने त्याला टीकांचा खूप सामना करावा लागला. हंगामातील शेवटच्या सामन्यात त्याने शतक झळकावले होते, त्याच अंदाजात त्याने इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. त्याने 171 चेंडूत 131 धावा केलेल्या आहेत, ज्यामध्ये 12 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे.

Comments are closed.