‘कॅप्टन गिल’ने विराटला टाकलं मागे! 'या' एका खेळीने बनला स्टार
शुबमन गिलने (shubman gill) इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकून अनेक विक्रम मोडले आहेत. कर्णधार म्हणून गिलचा हा पहिलाच कसोटी सामना आहे, ज्यामध्ये त्याने शतक ठोकून संघात चांगले वातावरण निर्माण केले आहे. आता गिलने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World test championship) विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकले आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) अजूनही त्याच्या पुढे आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या भारतीयांच्या यादीत गिलने आता विराट कोहलीला मागे टाकले आहे.
2019 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरू झाली, त्यानंतर विराट कोहलीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात एकूण 5 शतके झळकावली. आता गिलने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 6 शतके झळकावली आहेत. रोहित शर्मा हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा भारतीय खेळाडू आहे, ज्याने 9 शतके झळकावली आहेत. गिलचे वय फक्त 25 वर्षे आहे आणि तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा हा ऐतिहासिक विक्रम ज्यामध्ये सहजपणे रोहितला मागे टाकू शकतो.
जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत यशस्वी जयस्वालने विराट कोहलीची बरोबरी केली आहे. जयस्वालने आतापर्यंत 5 शतके केली आहेत, तर रिषभ पंतने देखील आतापर्यंत जागतिक कसोटी सामन्यात 4 शतके केली आहेत.
शुबमन गिलने इंग्लंडविरुद्ध शतक ठोकून विक्रम मोडले आहेत. या शतकासह शुबमन गिलने 2000 कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. तो कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्याच कसोटी डावात शतक करणारा 5वा भारतीय कर्णधार बनला. या सामन्यात त्याने कसोटीतील त्याचे वैयक्तिक सर्वोत्तम अर्धशतक झळकावले. त्याने 56 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
Comments are closed.