Akola News – प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांची आत्महत्या, विषारी इंजेक्शन टोचून संपवले जीवन

अकोल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या केली. जावरकर यांनी न्यू तापडिया नगरमधील राहत्या घरात विषारी इंजेक्शन टोचून जीवन संपवले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
डॉ. जावरकर हे अकोल्यातील डॉ. दीपक केळकर यांच्या सन्मित्र हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत होते. शनिवारी त्यांनी विषारी इंजेक्शन टोचून जीवनयात्रा संपवली. डॉ. जावकर यांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. जावकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलीस पुढील चौकशी करत आहेत, असे एबीपी माझाने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
Comments are closed.