US airstrikes on Iran – इस्रायल-इराण युद्धामध्ये अमेरिकेची उडी, इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला
इस्रायल-इराणमध्ये गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामध्ये अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर बॉम्ब हल्ले केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: आपल्या एक्स (आधाचे ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्याने महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर बॉम्ब हल्ले केले आहेत. यात फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या आण्विक तळांचा समावेश आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये हे तळ पूर्णपणे नष्ट झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली आहे. हा हल्ला यशस्वी झाला असून सर्व विमानं सुरक्षित परत आल्याचे त्यांनी म्हटले.
‘अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन ठिकाणच्या आण्विक तळांवर यशस्वी हल्ले केले आहेत. हल्ल्यानंतर सर्व विमानं इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर आली आहेत. फोर्डो या मुख्य आण्विक तळावर बहुतांश बॉम्ब टाकण्यात आले असून सर्व विमानं सुरक्षितपणे घराच्या दिशेने जात आहेत’, असे ट्रम्प यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले.
यावेळी ट्रम्प यांनी अमेरिकन सैनिकांचेही अभिनंदन केले. ‘अमेरिकेच्या महान योद्ध्यांचे अभिनंदन. जगातील इतर कोणतेही सैन्य अशी कारवाई करू शकत नाही. आता शांतता प्रस्थापित करण्याची वेळ आली आहे. या मुद्द्यांकडे लक्ष दिलेत त्याबद्दल आपले आभार’, असेही त्यांनी म्हटले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पोस्ट्स, “आम्ही फोर्डो, नटानझ आणि एस्फहान यासह इराणमधील तीन अण्वस्त्र साइटवर आमचा यशस्वी हल्ला पूर्ण केला आहे. सर्व विमाने आता इराणच्या हवेच्या जागेच्या बाहेर आहेत. फोर्ड, सर्व विमाने असलेल्या प्राथमिक जागेवर बॉम्बचा संपूर्ण पेलोड सोडला गेला. pic.twitter.com/pnkqmt95u6
– वर्षे (@अनी) 21 जून, 2025
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दोन आठवड्यांची मुदत दिली होती. या मुदतीआधीच अमेरिका युद्धात उतरली आणि इराणमध्ये घुसून हल्ले केले. अमेरिकेने यासाठी बी-2 स्टील्थ बॉम्बर विमानांचा वापर केला. या विमानांद्वारे 30 टॉमहॉक मिसाईल डागण्यात आली. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प 10 वाजता अमेरिकेला संबोधित करणार आहेत. ते काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इराण खरा मित्र! हिंदुस्थानचे मौन म्हणजे मूल्यांचे आत्मसमर्पणच, सोनिया गांधी यांचा लेख गाजला
Comments are closed.