साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 22 जून 2025 ते शनिवार 28 जून 2025

>> नीलिमा प्राचार्य

मेष – जीवनाला कलाटणी मिळेल

मेषेच्या सुखेषात बुध, सूर्य-गुरू युती. साडे साती सुरू आहे. तरीही कार्याला प्रयत्नांने पुढे नेता येईल. क्षुल्लक मतभेद संततीसोबत होतील. नोकरी-धंद्यात बदल, सुधारणा-लाभ, वसुली करा. थोरा-मोठय़ांशी परिचय-साहाय्य-सलगी होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात सत्य-असत्य पारखणे फारच कठीण असते. जुना अनुभव उपयोगी पडेल. प्रतिमा अधिक तेजस्वी होईल. जीवनाला कलाटणी मिळेल. चांगला दिवस 23, 26

वृषभ – खाण्याची काळजी घ्या

वृषभेच्या पराक्रमात बुध-मंगळ-गुरू लाभयोग. किरकोळ तणाव दूर करता येईल. गैरसमज-वाद जवळच्या व्यक्तीसमवेत होईल. नोकरीत प्रगती-बढती. धंद्यात मोह नको. फसगत टाळा. लाभ होईल. खाण्याची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय, वरिष्ठांची कामे कराल. परंतु प्रतिस्पर्धी गुप्त कारवाया करण्याचा प्रयत्न करतील. मात्र हे सर्व उघड होईल. ज्ञानात भर पडेल. चांगला दिवस 26, 27

मिथुन – पद-प्रतिष्ठा मिळेल

मिथुनेच्या धनेषात बुध-रवि-गुरू युती. आळस न करता वेळेला महत्त्व द्या. कामे वेगाने पूर्ण करा. प्रकृती सुधारेल. उत्साह निर्माण होईल. आत्मविश्वास वाढेल. अनेक दिवसापासून रखडलेली वैयक्तिक काम मार्गी लागेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात व्यापक स्वरूपात कार्य-मैत्री-विचार. लोकप्रियता-पद-प्रतिष्ठा मिळेल. केस मिटवा. जमीन-घर खरेदी-विक्रीत लाभ. परदेशगमन. चांगला दिवस 27, 28

कर्क – तडजोडीचे धोरण ठेवा

स्वराशीत बुध-चंद्र-शुक्र युती. क्षेत्र कोणतेही असो. सुमधुर वाणी-कार्य तत्परता ठेवा. यश जिद्दीने मिळवा. अहंकार नको. कायदा मोडेल असे कृत्य टाळा. डोळय़ांची काळजी घ्या. घरातील वृध्दांची चिंता. नोकरी टिकवा. धंद्यात निश्चित कराराची घाई नको. राजकीय-सामाजिक क्षेत्रात आश्वासन देण्याची घाई नको. मुद्दा नम्रतेने मांडा. तडजोडीचे धोरणच ठेवावे लागेल. चांगला दिवस 27, 28

सिंह – नोकरीत चांगला बदल

सिंहेच्या व्ययेषात बुध-सूर्य-गुरू युती. नकळत होणारे चुकीचे वक्तव्य त्रासदायक ठरेल. महत्त्वाची कठीण कामे करा. नवीन परिचय प्रेरणादायी असेल. नोकरीत चांगला बदल, परदेश योग-लाभ. धंद्यात सुधारणा-वसुली करा. चर्चेत सावध रहा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात योग्य वरिष्ठ व्यक्तीची मदत मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. लोकप्रियता मिळेल. आर्थिक सहाय्य मिळवता येईल. व्यवहार रेंगाळत ठेवू नका. चांगला दिवस 22, 23

कन्या – संयमी भूमिका घ्या

कन्येच्या एकादशात बुध-सूर्य-गुरू युती. रागाच्या भरात कुणालाही दुखवू नका. नकळत होणारी चूक टाळा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी-लाभ. प्रतिस्पर्धी मात्र नाराज. धंद्यात हिशोब तपासा. गोड बोला. उधारी नको. कोणताही कठीण प्रश्न सोडवता येईल, फक्त संयमी भूमिका घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रात कुणालाही कमी लेखू नका. चौफेर सावध रहा म्हणजे धोका टाळता येईल. सन्मान मिळेल. चांगला दिवस 26, 27

तूळ – धंद्यात जम बसेल

तुळेच्या दशमेषात बुध-सूर्य-मंगळ लाभयोग. सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध काम करावे लागेल. तणाव राहील.प्रेमाने, चातुर्याने कोणताही प्रश्न सोडवता येईल. त्यामुळे नकारात्मक विचार करू नका. नोकरीत नवा बदल-लाभ-परिचय-परदेशगमन. धंद्यात जम बसेल. चर्चेत दिशा मिळेल. वसुली करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा-पद-कार्याची स्तुती. दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल. चांगला दिवस 26, 27

वृश्चिक – प्रकृतीची काळजी घ्या

वृश्चिकेच्या भाग्येषात बुध-सूर्य-प्लुटो षडाष्टक योग. चौफेर तणाव-वाद-गैरसमज होईल. नम्रता-संयम ठेवा. सर्वत्र परीक्षेचा कालावधी वाटेल. प्रकृतीची काळजी घ्या. वृध्दांची चिंता वाटेल. व्यसन नको. नोकरी टिकवा. धंद्यात नुकसान टाळा. मोह नको. कोणत्याही कराराची घाई नको. राजकीय-सामाजिक क्षेत्रात विरोधक आक्रमक भूमिका घेतील. मित्र डावपेच खेळून अडचणी वाढवतील. चांगला दिवस 27, 28

धनुष्य वापरा – गोड आवाज

धनुच्या अष्टमेषात बुध-सूर्य-गुरू युती. अडचणी येतील. त्यातून मार्ग शोधता येईल. त्यामुळे अस्थिर होऊ नका. शब्द जपून वापरा. जिद्द ठेवा. मधुर वाणीचा वापर करा. नोकरीत व्याप-दगदग-यश. धंद्यात भोळसटपणा नको. वसुली करा. आळस नको. राजकीय-सामाजिक क्षेत्रात विचारांना, कार्याला चालना मिळेल. तुमच्या धाडसाचे कौतुक होईल. दूरदर्शीपणाचे प्रदर्शन होईल. चांगला दिवस 26, 28

मकर – प्रवासात सावध रहा

मकरेच्या सप्तमेषात बुध-मंगळ-प्लुटो षडाष्टक योग. चौफेर दबाव आहे असे वाटेल. मानसिक-शारीरिक त्रास जाणवेल. घरात चिंता-वाद. नोकरी टिकवा. दगदग-तणाव राहील. धंद्यात परिस्थिती सावरून घ्या. नवा विचार पुढे अंमलात आणता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात चोहो बाजूने मानसिक खच्चीकरण-आरोप-मानहानीचे शब्द ऐकावे लागतील. दुरावा होईल. प्रवासात सावध रहा. चांगला दिवस 27, 28

कुंभ – परदेशी दौरा होईल

पुंभेच्या षष्ठेशात बुध-सूर्य-गुरू युती. तुमचे वक्तव्य वादग्रस्त ठरेल. त्यामुळे सावधपणे बोला. सप्ताह दडपणाचा राहील. अनेकांचे सहकार्य मिळेल. नोकरीत कामाचा व्याप व यश-लाभ. धंद्यात अडचणी-खर्च-तणाव. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. त्याचबरोबर फार मोठ्या विषयासंबंधी निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे दडपण येईल. कायदा पाळून शब्दांचा वापर करा. चांगला दिवस 26, 27

मीन – सत्य-असत्य पारखून घ्या

मीनेच्या पंचमेषात बुध-सूर्य-प्लुटो षडाष्टक योग. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. कायद्याला धरून वागा. कोणत्याही विषयाची सत्य-असत्यता पारखून घ्या. म्हणजे मोठी चूक टाळता येईल. नोकरीत कामाचा व्याप-परिचयातून लाभ. धंद्यात गुंतवणुकीची घाई नको. राजकीय-सामाजिक क्षेत्रात निश्चित धोरण ठरवताना जुना अनुभव आठवा म्हणजे नुकसान टाळता येईल. चांगला दिवस 27, 28

Comments are closed.