काय सांगता! इराणमध्ये आयफोन 70 लाखाला

इराणमध्ये आयफोन 16 ची किंमत तब्बल 70 लाख ते 90 लाखांपर्यंत आहे. इराणमध्ये आयफोन 16 ची किंमत 35,785,000 ते 46,310,000 इराणी रियाल इतकी आहे. म्हणजेच 70 ते 90 लाखाच्या घरात आहे. हिंदुस्थानात आयफोन 16 ची किंमत 79,900 रुपये, आयफोन 16 ई 59,900 रुपये, आयफोन 16 प्रो 1 लाख 44 हजार 900 रुपये इतकी किंमत आहे. आयफोनमध्ये 6.2 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर ओलेड डिस्प्ले, 8 जीबी रॅम आणि 128-256-512 जीबी स्टोरेज मिळते.
Comments are closed.