Raju Khare used a clock symbol and photos of Ajit Pawar and Eknath Shinde in the advertisement


फेब्रुवारी महिन्यात भरत गोगावले पंढरपूर दौऱ्यावर होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी केलेली बॅनरबाजी चर्चेत आली होती. यानंतर आता राजू खरे यांनी पेपरात दिलेली जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना शिंदे गट विधानसभा निवडणुकीनंतर ऑपरेशन टायगर राबवताना दिसत आहे. इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माजी आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. फेब्रुवारी महिन्यात भरत गोगावले पंढरपूर दौऱ्यावर होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी केलेली बॅनरबाजी चर्चेत आली होती. यानंतर आता राजू खरे यांनी पेपरात दिलेली जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे. (Raju Khare used a clock symbol and photos of Ajit Pawar and मराठी in the advertisement)

राजू खरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे आमदार आहेत. राजू खरे यांनी स्थानिक दैनिकांमध्ये एक जाहिरात दिली असून त्यात त्यांनी पक्षाचे अधिकृत चिन्ह “तुतारी” ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या “घड्याळ” चिन्हाचा वापर केला आहे. त्यामुळे राजू खरे यांनी पक्षविरोधी भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राजू खरे यांनी स्थानिक दैनिकांमध्ये जाहिरात देताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे अभिनंदन केले आहे. महत्त्वाचे म्हणजे राजू खरे यांनी “घड्याळ” चिन्हाचा वापर जाहिरातीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो वापरले आहे. राजू खरे यांच्या जाहिरातीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष राजू खरे यांच्यावर काय कारवाई करतो? हे पाहावे लागेल.

हेही वाचा- Sanjay Raut : कारखान्याच्या निवडणुकीत ठाण मांडून बसलेले अर्थमंत्री…राज्याचे दुर्दैव, राऊतांची अजित पवारांवर टीका

राजू खरे पक्षात नाराज?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राजू खरे यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राजू खरे यांनी “माझ्या हातात चुकून तुतारी आली,” असे वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त भरत गोगावले हे पंढरपूर दौऱ्यावर होते. त्यावेळी राजू खरे यांनी भरत गोगावले यांच्या स्वागतासाठी प्लेक्स लागले होते. या फ्लेक्सवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांचे फोटो झळकले होते. शरद पवार आणि तुतारी चिन्ह गायब होते. त्यानंतर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात 10 जून रोजी पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 26 व्या वर्धापन दिन सोहळ्याला राजू खरे यांनी दांडी मारली होती. त्यामुळे राजू खरे यांच्या मनात नेमकं काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

हेही वाचा – Jitendra Awhad : “कितने आदमी थे…” सचिनने स्टाईल शिकवावी, पचनी पडत नाही, आव्हाडांची सचिन पिळगांवकरांवर टीका



Source link

Comments are closed.