A Finance Minister who is busy in a factory election… It’s the misfortune of the Maharashtra, Sanjay Raut criticizes Ajit Pawar.


शिवसेना उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

Mumbai : शिवसेना उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. महायुतीने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी केली जाईल, तसेच लाडक्या बहिणींचे मानधन २१०० रुपये केले जाईल, असे महायुतीच्या जाहीरनाम्यात जाहीर केले होते. मात्र निवडणुकीनंतर कोणतीही कर्जमाफी करण्यात आली नाही आणि लाडक्या बहिणींच्या मानधनात देखील कपात करुन १५०० रुपये करण्यात आले, निवडणुकीच्या तोंडावर अचानक कर्जमाफी जाहीर करणे म्हणजे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे आहे, अशा शब्दांत राऊतांनी महायुतीवर टीका केली.(Sanjay Raut: A Finance Minister who is busy in a factory election… It’s the misfortune of the Maharashtra, Sanjay Raut criticizes Ajit Pawar.)

अजित पवार म्हणतात माळेगाव साखर कारखान्याचा चेअरमन मी झालो की 24 तासात 500 कोटी रुपये कारखान्यासाठी घेऊन येतो. तुम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसे नाहीत, लाडक्या बहीणींना देण्यासाठी पैसे नाहीत, राज्याच्या इतर खर्चाला पैसे नाहीत मग गावातल्या कारखान्याला कुठून देणार? राज्याच्या तिजोरीत आहेत का? कोणत्या तिजोरीवर डल्ला मारणार? राज्याचे आर्थिक प्रश्न वाऱ्यावर सोडून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार त्यांच्या गावातल्या कारखान्याच्या निवडणुकीत ठाण मांडून बसले आहेत, हे राज्याचे दुर्दैव आहे. अशी टीका राऊतांनी उपमुखमंत्री अजित पवार यांच्यावर केली.

मनसे-शिवसेना युतीविषयी

दरम्यान, मनसे-शिवसेना युतीविषयी विचारले असता राऊत म्हणाले, या संदर्भातील निर्णय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेच घेतील. इतर कुणाच्या विधानांना फारसा अर्थ नाही. महाविकास आघाडी होणार अस कोणाला माहिती होतं का? राजकारणात खूप संयम ठेवावा लागतो, महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असताना उथावळेपणा योग्य नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत भिन्न विचारांचे लोक एकत्र आले, हा इतिहास राजकारणातील तरुण लोकांनी करणे गरजेच आहे, खूप उशिराने राजकारणात आलेल्यांनी यावर जास्त बोलू नये. ठाकरे कुटुंबाला मी फार जवळून ओळखतो काय होणार आहे हे मला माहिती आहे.


हेही वाचा… Sanjay Raut : फडणवीस स्वत: ज्युनिअर बोलबच्चन, उद्धव ठाकरेंवरील टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर



Source link

Comments are closed.