ईशान किशनचं नव्या संघासाठी पदार्पण! इंग्लंडमध्ये आक्रमक खेळी करण्यासाठी सज्ज!

सध्या भारतीय संघ आणि इंग्लंड संघामध्ये कसोटी सामन्यातील पहिला सामना लीड्समध्ये सुरू आहे (Test Series IND vs ENG). या दौऱ्यावर ईशान किशनला (Ishaan Kishan) भारतीय संघात सामील करण्यात आले नाही. यानंतर त्याने इंग्लंडमध्ये जाऊन पदार्पण केले आहे. त्याने इंग्लंडच्या मैदानावर काउंटी क्रिकेटमध्ये नॉटिंघमशर संघासाठी पदार्पण केले आहे. त्यांचा संघ काउंटी चॅम्पियनशिपमध्ये यॉर्कशायर विरुद्ध ट्रेंट ब्रिजमध्ये सामना खेळत आहे.

यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनला इंग्लंड दौऱ्यावर इंडिया ए मध्ये त्याला स्थान मिळाले होते, पण इंग्लंड लॉयन्स विरुद्ध त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. ईशान किशन 2023 पासून कसोटी संघातून बाहेर आहे. किशनला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर संघात स्थान मिळाले होते, पण त्याच्या काही कारणाने तो टीम इंडियातून बाहेर झाला होता, त्यानंतर पुन्हा त्याला संघात स्थान मिळाले नाही.

ईशान किशन आता नॉटीघमशर संघासाठी काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये त्याचा पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेला आहे, जिथे तो शानदार फलंदाजी करून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. आता हे बघणे गरजेचे असेल, की ईशान कोणत्या प्रकारे फलंदाजी करतो. काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी गेलेल्या ईशानने म्हटले, मी इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळून अनुभव घेण्यासाठी खूप उत्साहीत आहे, हे मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप चांगली संधी आहे.

ईशान किशन संघात सामील झाल्यानंतर नॉटीघमशर संघाचे मुख्य प्रशिक्षक पीटर मूर्स यांनी म्हटले आहे की, ईशानला काऊंटी क्रिकेट खेळायचे होते, या गोष्टीने त्यांना प्रभावित केले. त्याला काऊंटी क्रिकेटमध्ये सामील करून आम्हाला खूप आनंद झाला आहे.

ईशान किशनच्या फर्स्ट क्लास करियरवर नजर टाकायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत 58 सामन्यांमध्ये 8 शतक आणि 17 अर्धशतकांच्या मदतीने 347 धावा केल्या आहेत.

Comments are closed.