Weather update in Maharashtra for next few days IMD Alert


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचेही चित्र आहे. सोमवारी (23 जून) सकाळपासूनच पालघरसह बोईसर, डहाणू पश्चिम किनारपट्टी भागात पावसाची संततधार झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच, घाटमाथ्यावर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नुकतेच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यासाठी पुढील 24 तास हे महत्त्वाचे असणार आहेत. रविवारी (22 जून) पुणे आणि आसपासच्या भागात पावसाची गती कमी झाली आहे. (Weather update in Maharashtra for next few days IMD Alert)

हेही वाचा : Nitesh Rane : …त्यावर आझमीसारखं कार्ट काहीच बोलत नाही; एकेरी उल्लेख करत राणेंची सडकून टीका 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 तासात कोकण घाट परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मुसळधार तर राज्याच्या अंतर्गत भागात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत विदर्भातील काही भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबईसह ठाणे आणि आसपासच्या परिसरात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण गोवा मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागात 23 ते 27 जून मध्ये तीव्र ते अति तीव्र पावसाची शक्‍यता आहे. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून 23 ते 27 जून दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्रातही पावसाची हजेरी असेल.

हवामन खात्याने सांगितल्यानुसार, 23 ते 27 तारखेपर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची हजेरी राहणार आहे. सोमवारी संपूर्ण किनारपट्टी भागात पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत. हे अलर्ट पुढील तीन दिवस कायम राहणार असून पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले आहे. पुढील 3 दिवस किनारपट्टी भागात पावसाची हजेरी राहणार आहे. 24 जून रोजी पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यासह कोल्हापूर सातारा आणि पुणे घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम पावसाचा ईशारा दिला आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. 26 जून रोजी तळ कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत.



Source link

Comments are closed.