तांत्रिक स्नॅगमुळे इंडिगो फ्लाइट ग्राउंड

वृत्तसंस्था/ इंदूर

इंदूरहून भुवनेश्वरला जाणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान 6ई6332 उ•ाणापूर्वी धावपट्टीवरून परतले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पायलटने ऐनवेळी त्याचे उड्डाण रोखले. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत विमान पुन्हा टर्मिनलवर आणण्याचा निर्णय घेतला. विमानात बसलेल्या प्रवाशांना त्याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. हे विमान सकाळी 8:49 वाजता इंदूरहून भुवनेश्वरला निघण्याच्या तयारीत असतानाच त्याचे उड्डाण थांबवण्यात आले. कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले. आवश्यक दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर विमानाला पुन्हा उ•ाण करण्याची परवानगी देण्यात आली.

Comments are closed.