इंड. वि.

लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघासाठी आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये रिषभ पंतने (Rishbh Pant) खूप निराश केले होते, पण हंगामाच्या शेवटी त्याने शानदार शतक झळकावले होते. आता पुन्हा त्याच्या दमदार अंदाजात रिषभ पंतने हेडिंग्ले कसोटी सामन्यात सुद्धा शानदार खेळी केली आहे. भारतीय सुपरस्टार खेळाडू रिषभ पंतने पहिल्या कसोटी सामन्यात दोन्हीही डावात शानदार शतक झळकावले आहे, जे पाहून लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका (Sanjeev Goinka) यांनी त्याचे कौतुक केले आहे.

हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात यष्टीरक्षक रिषभ पंतने 134 धावा केल्या होत्या, तसेच दुसऱ्या डावात देखील त्याने118 धावा केल्या. ज्या कारणाने सध्या भारतीय संघ मजबूत परिस्थितीत दिसत आहे. पण त्या शानदार प्रदर्शनानंतर बिझनेस मॅन आणि लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे, खूप छान एका पाठोपाठ एक रिषभ पंतचे दोन शतक. आक्रमक, धाडसी आणि शानदार. इतिहासात कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा फक्त दुसरा यष्टीरक्षक खेळाडू. के एल राहुलचे (KL Rahul) सुद्धा शानदार शतकासाठी अभिनंदन!

धमाकेदार अंदाजात फलंदाजी केलेल्या रिषभ पंतने या सामन्यात एकूण 9 षटकार झळकावले. या सोबतच इंग्लंडच्या मैदानावर एका कसोटी सामन्यात सर्वात जास्त षटकार झळकवणारा देखील तो खेळाडू ठरला आहे. एंड्रयू फ्लिंटॉफ आणि बेन स्टोक्स यांनी देखील 9-9 षटकार झळकावले आहेत. पण यामध्ये रिषभ पंत पहिला आशियाई यष्टीरक्षक फलंदाज ठरलेला आहे, ज्याने एका कसोटी सामन्यांच्या दोन डावात शतक झळकावले आहे. संजीव गोयंका यांनी पहिल्या शतकानंतर देखील सोशल मीडियावर रिषभ पंतचे अभिनंदन केले होते.

Comments are closed.