बापाच्या विकृत अहंकाराचा बळी ठरलेल्या साधनाचं अक्षर होतं मोत्यासारखं ! हाच ‘तो’ शेवटाचा पेपर अन् मार्क
बारावीच्या चाचणी परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे शिक्षक असलेल्या बापानेच पोटची लेक साधना (वय 17) हिला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाल्याची (Sangli Crime News) घटना शुक्रवारी नेलकरंजी (ता. आटपाडी) येथे घडली आहे.

मुलीनं दिलेलं उलट उत्तर ऐकून शिक्षक असलेल्या धोंडीराम यांचा राग अनावर झाला. घरातच असलेल्या लाकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण केली. दुसऱ्या दिवशी सांगली येथील उषःकाल रुग्णालयात तिला उपचारांसाठी नेले असता उपचार पूर्वीच तिचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी साधना ही आटपाडीत बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिकत होती. तर वडील हे मुख्याध्यापक आहेत. साधना हिला बारावीमध्ये चाचणी परीक्षेत कमी मार्क मिळाले. वडील धोंडीराम भोसले यांना ही माहिती समजताच ते संतापले.

शुक्रवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास साधनाला घरातच लाकडी खुंट्याने मारहाण केली. बारावीतील चाचणी परीक्षेत कमी गुण कसे पडले? म्हणून धोंडीराम यांनी रागाच्या भरात हा अमानुष मारहाण केली. या मारहाणीत साधना ही गंभीर जखमी झाली. त्यातच साधनाचा मृत्यू झाला.

साधनाला बारावीच्या नीटच्या बोर्ड पॅटर्ननुसार, होणाऱ्या परीक्षांमध्ये 30 पैकी 19 तर ग्रुप मार्क्समध्ये 3 विषयाला 720 पैकी 173 मार्क पडले होते. याच मार्कांमुळे बापाचा पारा चढला होता.

साधनाचा हा पेपर होता. साधनाला बारावीच्या परीक्षेत 92 टक्के मार्क पडले होते. अभ्यासात हुशार असणाऱ्या साधनाचं अक्षरही सुंदर आणि स्वच्छ होतं.

साधना आटपाडीत बारावीचे महाविद्यालयात शिक्षण घेत होती. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत होती. तिला डॉक्टर करण्याचे कुटुंबीयांचे स्वप्न होते. नुकतीच एक सराव परीक्षा झाली होती. त्यात तिला कमी गूण मिळाले. त्यामुळे वडील धोंडीराम चिडले

शुक्रवारी रात्री वडील धोंडीराम यांनी मुलगी साधनाला कमी मार्क का पडले? याचा जाब विचारत मारहाण केली. यादरम्यान साधनानेही त्यांना उलट उत्तरं दिली. ‘पप्पा तुम्हालाही कमीच गुण मिळाले होते. तुम्ही कुठे कलेक्टर झालात? असं साधनाने देखील म्हटलं.
येथे प्रकाशितः 24 जून 2025 08:16 एएम (आयएसटी)
Sangli फोटो गॅलरी
आणखी पाहा
Comments are closed.