Monsoon Snacks : पावसाची मज्जा वाढवणारे चटपटीत स्नॅक्स

पावसाळ्यात वातावरणात थंडावा असतो. अशा वातावरणात काहीतरी मसालेदार, चटपटीत, गरमागरम खावेसे वाटते. या दिवसात काही स्नॅक्स गरमागरम चहासोबत खाल्ल्याने पावसाचा आनंद द्विगुणित होतो. घराबाहेर पडणारा पाऊस, मातीचा सुगंध आणि हातात गरमा गरम चहा त्यासोबत खाण्यासाठी कुरकुरीत पदार्थ म्हणजे एक प्रकारचा वेगळा आनंद असतो. आपल्या देशातील पावसाळा केवळ ऋतू नसून एक खास अनुभव देणारा, ज्यामध्ये काहीतरी चविष्ट आणि टेस्टी खावेसे वाटणारा ऋतू आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात खाल्ले जाणारे काही स्वादिष्ट आणि चटपटीत स्नॅक्स सांगणार आहोत, ज्याची मज्जा तुम्ही पावसाळ्यात आवर्जून घ्यायला हवी.

भजी –

पाकोडा

पावसाळा आणि भजी हे जणू समीकरण आहे. या ऋतूत तुम्ही कांदा, मिरची, पनीर, बटाट्याची भजी बनवू शकता.

समोसा –

समोसा

पावसाळ्यात समोसे तुम्ही बनवू शकता. यात अनेक पदार्थांचे स्टफिंग असते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात वटाणे, शेंगदाणे ऍड करू शकता.

कचोरी –

काचोरी

कुरकुरीत कचोरी अनेकांना खूप आवडते. ही कचोरी तळून तयार केली जाते. संध्याकाळच्या नाश्त्यात तुम्ही या कुरकुरीत कचोरीचा आनंद घेऊ शकता.

दही पापडी चाट –

dahi papadi chaat

ताज्या दह्यासोबत तुम्ही दही पापडी बनवून पावसाचा आनंद द्विगुणीत करू शकता. पावसाळ्यातील तल्लफ कमी करण्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे.

बटाटा भरलेला कटलेट –

आलू टिक्की

आलू टिक्की गरमागरम सर्व्ह करण्यासाठी एक उत्तम पदार्थ आहे. ही टिक्की उकडलेल्या बटाट्यापासून बनवण्यात येते. तुम्ही पावसाळ्यात संध्याकाळच्या नाश्त्यात नक्कीच बनवू शकता.

वडापाव –

वडा पाव

मुंबईतील फेमस असा वडापाव वर्षांचे बारा महिने खाल्ला जातो. पावसाळ्यात तर गरमागरम वडापाव खाण्याची मज्जा काही औरच असते.

 

 

 

हेही पाहा –

Comments are closed.