Ladki Bahin Yojana June installment When will be available
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर 1500 रुपयांचा हप्ता न चुकता जाणे, हे सरकारसमोरील मोठे आव्हान आहे.
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर 1500 रुपयांचा हप्ता न चुकता जाणे, हे सरकारसमोरील मोठे आव्हान आहे. या योजनेमुळे घरबसल्या महिलांना मोठा फायदा झाला आहे. पण आता जून महिना संपायला अवघा आठवडा राहिला आहे, पण लाडक्या बहिणींच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे या महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार? असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे. महत्त्वाची बाब साधारणतः 15 तारखेनंतर सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून हप्ता कधी जमा तकण्याच येणार? याबाबतची माहिती देण्यात येते. पण आता महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला असूनही याबाबतची कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. (Ladki Bahin Yojana June installment When will be available)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 11 महिन्यांचे 1500 रुपयांप्रमाणे 16 हजार 500 रुपये मिळाले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार एका वर्षात डीबीटीद्वारे लाडक्या बहिणींना किंवा लाभार्थ्यांना 18 हजार रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी म्हणजेच जुलै 2024 पासून ही योजना सुरू केली होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम एकाचवेळी लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आले होते. आता जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. पण अद्यापही लाडक्या बहिणींना या महिन्याच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा आहे.
हेही वाचा… Farm Loan Waiver : शब्द फिरविणे हा मुख्यमंत्र्यांचा छंदच, सचिन सावंतांचे शरसंधान
महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या महायुतीला लाडकी बहीण योजनेमुळं मोठा फायदा झाला. महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता कधी होणार याकडे देखील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. पण आता लाडक्या बहिणींसाठी इतर खात्यातील निधी वळविण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यासाठी सरकारची मोठी दमछाक होत असल्याची चर्चा रंगली आहे. म्हणूनच आता या योजनेचा 12 हप्ता या महिन्यातच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार की, याकरिला लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments are closed.