बॅटिंग पोझिशनवर केएल राहुलचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “माझी जागा बदलत राहिली, पण…”
केएल राहुल विधानः केएल राहुल तो फलंदाज आहे, ज्याने भारत आणि इंग्लंड यांच्यातील लीड्स कसोटीच्या दोन्ही डावांत कठीण परिस्थितीत चांगली फलंदाजी केली. दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावले आणि भारतासाठी सर्वाधिक (137) धावा केल्या. दिवसाचा खेळ संपल्यानंतर तो पत्रकार परिषदेत आला, त्याने आपल्या फलंदाजीच्या स्थानाबद्दल प्रतिक्रिया दिली. (KL Rahul Batting Position)
गेल्या काही काळापासून केएल राहुलची फलंदाजीची जागा निश्चित राहिलेली नाही, त्याचा फलंदाजी क्रम वारंवार बदलत राहिला आहे. पण, तो सर्वाधिक वेळा सलामीवीर म्हणून खेळला आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत राहुलला यशस्वी जयस्वालसोबत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने पहिल्या डावात 42 आणि दुसऱ्या डावात 137 धावा केल्या.
लीड्स कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत आलेल्या केएल राहुलने सांगितले की, गेल्या काही वर्षांत तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करण्यात सोयीस्कर असतो, हे विसरून गेला होता. त्याला कधी डावाची सुरुवात करण्यासाठी, तर कधी तिसऱ्या आणि कधी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले गेले. यामुळे राहुल त्याच्या फलंदाजीचा क्रम बदलत राहिल्याने आधी खूश नव्हता का, असा प्रश्न निर्माण झाला, पण त्यानंतर राहुल म्हणाला की, “मला जी काही जबाबदारी दिली गेली ती मी पार पाडली. गेल्या काही मालिकांमध्ये मी सलामीवीर म्हणून माझ्या भूमिकेचा आनंद घेत आहे.” (KL Rahul Press Conference)
केएल राहुलने यापूर्वी अनेकदा आपल्या फलंदाजीच्या स्थानाबद्दल वक्तव्य केलं आहे, तो नेहमी म्हणत आला आहे की, त्याला फलंदाजीच्या स्थानाचा फारसा फरक पडत नाही, त्याला फक्त खेळायचे आहे, मग ते कोणत्याही स्थानावर असो. राहुलच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, 58 सामन्यांच्या 101 डावांमध्ये त्याने 3,257 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 17 अर्धशतकांसह 9 शतके झळकावली आहे. (KL Rahul Test Career Stats)
केएल राहुलने कोणत्या स्थानावर किती धावा केल्या? (Batting Order Flexibility)
सलामीवीर म्हणून- 85 डावात 2,982 धावा
तिसऱ्या क्रमांकावर- 7 डावात 112 धावा
चौथ्या क्रमांकावर- 2 डावात 86 धावा
सहाव्या क्रमांकावर- 9 डावात 234 धावा
Comments are closed.