12 व्या वर्षापासून टूथब्रश पोटात घेऊन राहिला, वयाच्या 62 व्या वर्षी शस्त्रक्रियेतून बाहेर काढला!

चीनमधील एका डॉक्टरांनी भयंकर शस्त्रक्रिया केली. येथे डॉक्टरांनी पोटदुखीची तक्रार करून रुग्णालयात गेलेल्या 64 वर्षीय व्यक्तीच्या आतड्यातून एक टूथब्रशचा तुकडा काढला आहे. 17 सेमी लांबीचा हा टूथब्रश गेल्या 52 वर्षांपासून त्याच्या शरीरात अडकला होता. या प्रकाराने सगळेच अवाक झाले आहेत.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टमधील वृत्तानुसार, यांग असे या व्यक्तीचे नाव आहे. यांगला अचानक पोटदुखी सुरू झाल्याने ते डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेले होते. दरम्यान, डॉक्टरांना तपासणी करताना यांग यांच्या पोटात ठोकळ्यासारखी वस्तू आढळून आली. त्यामुळे त्यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
शस्त्रकियेसाठी डॉक्टरांनी यांग यांच्या आवश्यकत्या सगळ्या चाचण्या केल्या. यानंतर एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया 1 तास 20 मिनिटे चालली. एवढ्या मोठ्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर यांग यांच्या पोटातून एक टूथब्रशचा तुकडा काढण्यात आला. गेल्या तीन वर्षांत रुग्णाच्या पचनसंस्थेतून एखादी वस्तू काढण्यासाठी रुग्णालयात लागलेला हा सर्वात जास्त वेळ होता, असे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, डॉक्टरांनी यांगला या टूथब्रशबाबत विचारले असता यांगने धक्कादायक उत्तर दिले. मी कदाचित 12 वर्षांचा असताना टूथब्रश गिळल्याचे आठवते. परंतु माझ्या पालकांना त्याबद्दल सांगण्यास मी खूप घाबरलो होतो. मला असा विश्वास होता की टूथब्रश स्वतःच विरघळेल. मात्र असे काही झाले नाही. मात्र इतक्या वर्षांत मला कसलाही त्रास झालेला नाही, असे यांग यांनी डॉक्टरांना सांगितले.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, आतड्यातील टूथब्रशची हालचाल होऊ शकते. त्यामुळे आतड्यांना छिद्र पाडू शकतात. यामुळे माणसाच्या जीवालाही धोका होऊ शकतो.
Comments are closed.